शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माझी शाळा माझे झाड उपक्रम राबवण्याची गरज : अभिनेते सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:48 IST

प्रत्येक माणसाला शिकण्यासाठी आई हे पहिले विद्यापीठ तर झाड हे दुसरे विद्यापीठ आहे.

केडगाव : प्रत्येक माणसाला शिकण्यासाठी आई हे पहिले विद्यापीठ तर झाड हे दुसरे विद्यापीठ आहे. निसर्ग, वृक्ष नसतील तर मानवाला अन्न-पाणी काहीच मिळाणार नाही. ट्री स्टोरी फाऊंडेशन माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी, त्यासाठी वातावरण निर्मितीसाठी झाडांचे वाढदिवस, वृक्ष महोत्सव यासारखे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पर्यावरण स्नेही संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ट्री स्टोरी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यातील नगरसह औरंगाबाद, नाशिक, सातारा, धुळे, बीड यासह 19 ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ हाती घेतलेली आहे. एक एकर मध्ये 400 झाडांची रोपटी लावून देवराई प्रकल्प उभारणार आहे. यासाठी किमान एक एकर ते त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात झाडे लावणार आहे. यामध्ये वेली, वेली, झुडपे, जंगली झाडे, तसेच वड, पिंपळ, लिंब यासारखी मोठी झाडे, फळझाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील मोकळ्या जागा तसेच सरकारी क्षेत्रातील वन विभाग, गायरान क्षेत्रातील जागांवर झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सयाजी शिंदे म्हणाले, की शहरी भागातील लोक उपदेशाचे डोस पाजतात. त्यांच्याकडून प्रत्यक्षात कृती होत नाही, याउलट ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेमध्ये प्रेम, आपुलकी, सहकायार्ची भावना आहे. ते प्रत्यक्ष कृती तरी करतात. त्यामुळे यापुढील भागात काळात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात हाती घेतले जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची सक्ती केली तरी वृक्षसंवर्धनच्या चळवळीला त्याचा मोठा फायदा होईल. माझी शाळा, माझ्या शाळेतील एक झाड याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या नावाने झाड लावण्यासाठी त्यांना प्रेरित केले जाणार आहे. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या गावात झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तर त्यांना फार मोठी प्रतिष्ठा मिळू शकते. यापुढील काळात जो झाडे लावील तो प्रतिष्ठित अशी व्याख्या नव्याने तयार करण्यात येणार आहे. वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीमध्ये मविचारी माणसे जोडली जाणार आहेत. यावेळी अमोल जाधव उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर