शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 13:52 IST

पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पावणेदोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला होता.

ठळक मुद्देपाथर्डी तालुक्यातील घटना : जिल्हा न्यायालयाचा निकाल

अहमदनगर : पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पावणेदोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला होता.ज्ञानेश्वर बाळू डुकरे (रा. हनुमानवस्ती, अकोला, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. मुलीची आई सरस्वती जायभाये यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल घोडके यांनी काम पाहिले. दि. १ फेब्रुवारी ते ९ सप्टेंबर २०१६ दरम्यान फिर्यादीची मुलगी सावित्रा ही अकोला येथे सासरी नांदत असताना तिचा पती ज्ञानेश्वर डुकरे हा चारित्र्याच्या संशयावरून सावित्राचा मानसिक, शारीरिक छळ करीत असे. त्यातूनच दि. १ सप्टेंबर २०१६ रोजी आरोपी पती ज्ञानेश्वर याने सावित्राचा नाक व तोंड दाबून खून केला.हा खटला येथील जिल्हा न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षाच्या वतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात घाटी हॉस्पिटमधील डॉक्टर गणेश निदूरकर यांची साक्ष महत्वाची ठरली. सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश व्ही. डब्ल्यू. हूड यांनी आरोपी ज्ञानेश्वर डुकरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल घोडके यांना एन. जे. गर्जे यांनी सहाय्य केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी