शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

विनायकनगरमध्ये पती-पत्नीचा खून

By admin | Updated: September 18, 2014 23:40 IST

अहमदनगर : पुणे रस्त्यावरील विनायकनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाश गुलाबराव रोडे (वय ५७) आणि मीना प्रकाश रोडे (वय ४७) यांचा अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.१७) मध्यरात्री खून केला.

अहमदनगर : पुणे रस्त्यावरील विनायकनगरमध्ये राहणाऱ्या प्रकाश गुलाबराव रोडे (वय ५७) आणि मीना प्रकाश रोडे (वय ४७) यांचा अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.१७) मध्यरात्री खून केला. एका लोखंडी टणक वस्तुने डोक्यात घाव घातल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. पुणे रस्त्यावरील विनायकनगरमध्ये समता कॉलनी असून कॉलनीच्या एका बाजूला शेती आहे. कॉलनीमध्ये रोडे यांचा बंगला आहे. सकाळी अकराच्या सुमारास रोडे यांच्याकडे मोलकरीण आली असता त्यांना घरामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. तिने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांना ही माहिती कळविली. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.रोडे यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेतच बेडवर होता. त्यांची झोपलेल्या अवस्थेतील हाताची घडीही विस्कटली नव्हती. डोक्यात टणक वस्तुने घाव घातल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे डोके रक्ताच्या थारोळ््यात होते. त्यांची पत्नी मीनाश्री उर्फ मीना यांचा मृतदेह शौचालयात आढळून आला. त्याही रक्ताच्या थारोळ््यात होत्या. त्यांच्याही डोक्यात टणक वस्तुने वार केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. शौचालयाच्या बाहेरही रक्त सांडलेले होते. घरामध्ये कपाटातील सामानाची उचकापाचक करण्यात आलेली आहे. देवघरातील चांदीची मूर्ती मात्र तशीच होती. त्यांच्या घरातून काय चोरीला गेले हे सांगण्यासाठी कोणीही नसल्याने चोरीबाबत काहीही कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, लक्ष्मण काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी) बुधवारी मध्यरात्री खून झाल्यानंतर सकाळी अकरापर्यंत या घटनेची कोणालाही माहिती नव्हती. मोलकरीण भांडे घासण्यासाठी आली त्यावेळी घराचे लोखंडी गेट उघडेच होते. तसेच आतील दरवाजाही उघडाच होता. बाहेर ठेवलेले भांडे मोलकरणीने घासले आणि धुणे मागण्यासाठी आवाज दिला असता आतून काहीही आवाज आला नाही. त्यावेळी तिने घरात जाऊन पाहताच दोघांचा खून झाल्याचे दिसले. चोरटे घराच्या मागील कंपाऊंडवरुन उडी टाकून मागच्या गेटने घरामध्ये शिरले असण्याची शक्यता आहे. मीनाक्षी यांनी दार उघडताच त्यांच्या डोक्यात वार करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. घरात दोघेच४घरामध्ये प्रकाश आणि मीना रोडे दोघेच राहत होते. त्यांचा मुलगा स्वप्नील हा अमेरिकेत आहे, तर मुलगी कोमल ही पुण्यात शिक्षण घेते. रोडे कुटुंबीय हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे काही नातेवाईक कॉलनी परिसरात राहतात. प्रकाश रोडे हे हवाईदलात नोकरीला होते. ते निवृत्त झाले असून सध्या ते एल अ‍ॅण्ड टी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होते. मयत रोडे दाम्पत्यावर सुरेगाव येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. घटनास्थळी गर्दी४घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, वाय.डी. पाटील यांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती. महापौर संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश भोसले, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. मयत रोडे कुटुंबीय हे अ‍ॅड.अनुराधा येवले यांचे नातेवाईक आहेत.