शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

प्रवरा कालव्याजवळच्या वटवृक्षांची शंभरी पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:22 IST

कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी.

गणेश आहेरलोणी : कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे, कालव्यांच्या भरावाला मजबूती राहावी, जमिनीची धूप कमी व्हावी. वास्तवाला आल्यानंतर गर्द सावलीत आरोग्याच्या दृष्टीने भरपूर आॅक्सिजन मिळावा, अशा एक ना अनेक.. उदात्त हेतूने ब्रिटिशांनी लावलेल्या प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कडेला असलेल्या शेकडो वटवृक्षांच्या झाडांनी आता शंभरी पार केली आहे.प्रवरा नदीवरील ओझर (ता.संगमनेर) बंधाºयापासून प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांना सुरूवात होते. उजवा कालव्याचा शेवट देवळाली प्रवरा येथे होतो. ३३ मैलाचा म्हणजे ५३ किलोमीटर अंतराचा हा कालवा आहे. सोनगाव आणि देवळाली येथे असलेल्या विश्रामगृहाजवळ मोठ्या प्रमाणावर हे वडांचे डेरेदार वटवृक्ष आहेत. डाव्या कालव्याचा शेवट हा बेल पिंपळगाव येथे आहे. या कालव्यानजीक आश्वी, लोणी, खंडाळा, वडाळा या ठिकाणी असलेल्या विश्रामगृहाच्या परिसरातील महाकाय वटवृक्ष सर्वांचाच आकर्षणाचा विषय ठरत आहे. ४८ मैल म्हणजे ७७ किलोमीटर अतंराचा हा डावा कालवा आहे.साधारणपणे १९१०-१२ साली लावलेल्या या वडाच्या झाडांचा लागवडीचा साक्षीदार आज कोणीही हयात नसला तरी डेरेदार अशी महाकाय झालेली ही वडाची वृक्ष आज वाटसरू, पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान बनली आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी ज्यावेळी कालव्यांची कामे सुरू केली होती. त्यावेळी कामावर देखरेख करण्यासाठी काही ठराविक अंतरावर बांधलेल्या विश्रामगृहांच्या परिसरात या वटवृक्षाची संख्या अधिक आहे.पण सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाचे फारसे लक्ष नसल्याने या महाकाय वृक्षांची छाटणी सुरूच आहे.वडाचे झाड अमर आहे. म्हणूनच स्त्रिया या झाडांप्रमाणे आपल्या पतीला अमरत्व मिळावे, या भावनेतून त्याची पूजा करतात. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढणाºया असतात. परत या पारंब्यांनाच पालवी फुटते. आपल्या पतीचे आयुष्य पारंब्यांप्रमाणेच वाढते राहो, अशीही धारणा स्त्री वर्गात मानली जाते म्हणूनच मनोभावे या झाडाची पूजा केली जाते. या झाडांच्या पारंब्या नेहमी वाढतात. जमिनीला टेकल्यानंतर परत त्यांना पालवी फुटते. हे झाड दोन ते अडीच एकर इतकी जागाही व्यापते. पेमगिरी (ता.संगमनेर) येथील वडाचे झाड याचे उत्तम उदाहरण आहे. वडाचे झाड हे धार्मिकतेसह औषधींसाठी उपयुक्त असल्याने त्याचे जतन करणे गरजचे आहे. - प्रा.डॉ.अनिल वाबळे, वनऔषधी संशोधक, लोणी.

ब्रिटिशकालिन असलेल्या विश्रामगृहांच्या परिसरातच ही वटवृक्ष आहेत. पर्यावरणाला पूरक असा हेतू त्याकाळी वटवृक्ष लागवडीमागे होता. शिवाय कालव्याच्या कामादरम्यान विश्रामगृहाभोवती गारवा राहावा असाही उद्देश ब्रिटिशांचा असावा म्हणून मोठ्या प्रमाणावर ही वटवृक्ष विश्रामगृह परिसरात लावले असावेत.-संजय रामदास गणेश, पाटबंधारे शाखा अभियंता, लोणीकालव्याच्या कामावेळी कालव्यांच्या भरावाचा सर्व्हिस रोड म्हणून ब्रिटिश वापरत होते. पुढे याच ठिकाणी विश्रामगृहे बांधली गेली असावीत. भराव खचून नुकसान होऊ नये, वर्दळीच्या ठिकाणी कालवे फुटू नये म्हणून ही वटवृक्ष लावली असावीत. पर्यावरण जतन करणे हा उदात्त हेतू होताच आणि आजही आहे.- संजय सिनारे, पाटबंधारे शाखा अभियंता, देवळाली प्रवरा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर