शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यात डेंग्यू संशयित शेकडो रूग्ण, शासनदप्तरी दोघांचीच नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:20 IST

वरूर येथील इयत्ता आठवीतील अनिकेत रावसाहेब तुजारे या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यावर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागात मागील दोन महिन्यात दोघेच डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे.

अनिल साठे / धर्मनाथ ढाकणे ।  शेवगाव : तालुक्यातील वरूर येथील इयत्ता आठवीतील अनिकेत रावसाहेब तुजारे या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यावर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागात मागील दोन महिन्यात दोघेच डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे. मात्र उपाचर घेतलेल्या तसेच सध्या उपचार घेत असलेल्या डेंग्यू संशयित (एन.एस.वन) रुग्णांची संख्या शेकडोच्या घरात असल्याचे दै. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.शेवगाव शहरातील विविध हॉस्पिटल, प्रयोगशाळांना भेटी दिल्या असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. शासन निर्णयानुसार खासगी वैद्यकीय व्यावसायिक व प्रयोगशाळांना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार डेंग्यूचा संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यातील अनेक रूग्णालयांनी तशी माहिती दिली नसल्याचे समोर आले.शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘लोकमत टीम’ने शहरातील तीन खासगी रुग्णालयांना भेटी देत चौकशी केली केली. यावेळी संबंधित वैद्यकीय चिकित्सकांनी गत दोन महिन्यात शेकडो डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी आल्याचे व शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असतांना आरोग्य विभागाच्या दप्तरी दोनच रूग्णांची नोंद आहे. जिल्हा रुग्णालयाने कळवल्याने ‘त्या’ दोन नोंदी करण्यात आल्याचे संबंधित अधिका-याने सांगितले.शहरातील काही रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळामधे जाऊन डेंग्यू आजाराच्या निदानासाठी आकरण्यात येणारे शुल्कासंबंधी चौकशी केली असता ९०० ते एक हजार रूपये आकारात असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराच्या निश्चित निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक ‘टेस्ट किट’चा वापर करण्यात येऊ नये, असे आदेश दिलेले असताना शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेऊन रुग्णांची लूटमार सुरू असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूShevgaonशेवगाव