शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संतांपुढे नतमस्तक व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:18 IST

संतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय.

सन्मतीवाणीसंतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. आपल्याला प्रत्येक कामात संतांचे, श्रेष्ठांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. त्याकरिता आपण गर्विष्ठवृत्तीला दूर सारले पाहिजे. गर्वामुळे खूप नुकसान होते. कोणाशीही चांगले संबंध ठेवता येत नाहीत. गर्वाला हद्दपार करा. मग पाहा जीवन किती सुंदर असते. मन निर्मळ हवं. निर्मळ मनामुळे मानसिक शांतता लाभते. जो माणुस नेहमी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो तोच जीवनात यशस्वी होतो. तपस्येप्रमाणे नतमस्तक होण्यालाही तितकेच महत्त्व आहे. जीवनात नम्रता, लीनता हे गुण हवेतच. वृषभदेवांनी शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. कला, संस्कृती शिकविली त्यांचे अनंत उपकार आहेत. संतांच्या शिकवणीपासून आपण ज्ञान घेतले पाहिजे. संत सन्मार्ग दाखवितात संतांचे कार्य महान आहे. संतांच्या अंगी त्यागवृत्ती असते. वंदनीय व्यक्तींचा सहवास, मार्गदर्शन मिळणे दुरापास्त असते. जीवनात गुरुची आवश्यकता असते.     जेथे धर्मश्रध्दा जागृत होते तेथे द्वेष नष्ट होतात. गढूळ पाणी शांत झाल्यावर वरचे पाणी नितळ होते. शांतवृत्ती बाळगल्यामुळे मुळ जीवन आनंददायी होते.मनुष्य जन्म दुर्लभ आहे. चांगले काम करा, चांगले बोला, चांगले वर्तन ही त्रिसूत्री अंमलात आणली तर  प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नम्रपणा हा गुण श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाने अंगी बाळगावा.                                                                                                                                                                           - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर