शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्यात खोदकामात आढळले मानवी सांगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 20:24 IST

चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे.

ठळक मुद्देचांदेगाव येथील प्रकार पुरातत्व विभागाशी संपर्क

श्रीरामपूर : चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे.बेलापूर खुर्दपासून दोन किलोमीटर अंतरावर चांदेगाव आहे. या ठिकाणी चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिरात जीर्णोद्धारासाठी खोदकाम सुरु होते. शुक्रवारी दुपारी मजुरांना तेथे एक मानवी सांगाडा आढळून आला. एखाद्या साधूने येथे समाधी घेतली असावी, असे गावकऱ्यांना प्रारंभी वाटले. मात्र, पुढे खोदकाम सुरू झाल्यानंतर आणखी काही मानवी सांगाड्यांचे अवशेष सापडले. या सांगाड्यांच्या कवटीभोवती माठ आढळून आला. त्यामुळे हे अवशेष पुरातन असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.चांदेगावपासूनच दहा किलोमीटर अंतरावर असणाºया दायमाबाद येथे पूर्वी उत्खनन करण्यात आले होते. तेथे अशाच प्रकारचे अवशेष मिळून आले. त्यामुळे या जागेवर उत्खनन केल्यास पुरातन अवशेष सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभ्यासक प्रा.गणी पटेल यांनी या संदर्भात पुरातत्व विभागाकडे छायाचित्रे पाठविली आहेत. गावातील संजय भांड, श्रीनिवास मारुती श्ािंदे, दादासाहेब चांगदेव उबाळे, जनार्दन रामनाथ गायकवाड, दादा भांड, गवजी नाना शिणारे, अमोल भांड, संकेत कणसे आदींनी तहसीलदार अनिलदौंडे यांना घटनेची माहिती दिली आहे. 

चंद्रेश्वर मंदिराजवळ असणारे लिंबाचे जुने झाड पाचशे वर्षापूर्वीचे असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे सांगाडे पुरातन काळातील असावेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे काही शास्त्रज्ञ भेट देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर