शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

काही सेकंदात ॲपवरील नोंदणी संपते कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

अहमदनगर : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनावरील लसीकरण प्रक्रियेत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर स्लॉट ...

अहमदनगर : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनावरील लसीकरण प्रक्रियेत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर स्लॉट बुकिंगसाठी त्यांना तासन्‌तास मोबाईल किंवा कॉम्प्युटरसमोर बसावे लागत आहे. परंतु, काही सेकंदातच नोंदणी हाऊसफुल्ल होते. त्यामुळे अनेकांचे बुकिंग होत नसल्याने निराशा पदरी येते. यावर कळस असा की, नोंदणी केलेल्यांना लस देताना पुन्हा ऑनलाईन तपासणी केली जाते. नोंदणी झाल्याची खात्री करूनच लस दिली जात असल्याने लसीकरण केंद्रांवरही गाेंधळ उडत आहे.

राज्यभर एकाच दिवशी १ मे रोजी १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी कोविन पोर्टलवरून किंवा ॲपवरून ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे; परंतु नोंदणीसाठीची वेळ निश्चित नाही. त्यामुळे नोंदणी केव्हा करावी, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कधीही नोंदणीला सुरुवात होते. आजही काही सेकंदातच संबंधित केंद्रावरील नोंदणी पूर्ण झाल्याचे संकेतस्थळावर दर्शविले जाते. काहींना तर तासन्‌तास प्रयत्न करूनही ओटीपीच येत नाही. त्यामुळे नोंदणीही होत नाही. पुन्हापुन्हा नोंदणी करूनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, ते केंद्राकडे बोट दाखवतात. त्यांनाही या नोंदणीबाबत फारशी माहिती नाही. नोंदणीची वेळ आणि स्थानिक नागरिकांनाच प्राधान्य का दिले जात नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

.......

१० दिवसांत १० हजारांचे लसीकरण

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या अंदाजे १२ लाख इतकी आहे. १ मे १० मे या दहा दिवसांत शहरासह जिल्ह्यातील १९ हजार ५७५ नागिरकांना लस दिली गेली आहे. लसीकरणाची ही गती कायम राहिल्यास या वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.

......

३ सेकंदात ३०० डोस बुक

कोरोनावरील लस घेण्यासाठी ॲपवर नोंदणी झाल्यानंतर काही सेकंटात स्लॉट बुक होतात. साधारणपणे ३ सेकंदात ३०० डोस बुक होत असल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे.

......

व्हेरिफेशन होत नसल्याने मनस्ताप

ॲपवर स्लॉट बुक झाल्यानंतर नागरिक लस घेण्यासाठी संबंधित केंद्रावर जातात. तिथे गेल्यानंतर रांगेत उभे राहावे लागते. तासन्‌तास नंबर येत नाही आणि आलाच बुकिंग केले आहे का असा प्रश्न विचारला जातो. बुकिंगचे व्हेरिफेशन करून संबंधित नागिरकांना लस दिली जाते; परंतु अनेकांचे व्हेरिफेशनच होत नाही. त्यातही वेळ जातो. व्हेरिफेशन न झाल्याने काहींना लस नाकारली जाते.

......

जिल्हा, तालुका, आरोग्य केंद्रनिहाय नोंदणी नाही

लसीकरणासाठी एकच ॲप असल्याने कुणी कुठेही स्लॉट बुक करू शकतो. त्यामुळे स्लॉट काही सेकंदात संपतात. जिल्हा, तालुका किंवा आरोग्य केंद्रनिहाय स्लॉट बुकिंगची वेळ निश्चित केल्यास नागरिकांना बुकिंग करणे सुलभ होईल. परंतु, तशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

.....

शहरातील नागरिक ग्रामीण भागात

शहरी भागातील तंत्रस्नेही नागरिक एकमेकांना माहिती देतात. शहरात स्लॉट मिळाले नाही तर ते ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांतील स्लाॅट बुक करत असून, तिथे जाऊन लस घेतात. त्यामुळे स्थानिक व बाहेरचा असा वाद अनेक ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे.

....

सूचना : १ ते १० तारखेचा चार्ट बाकी आहे, तो टाकतो मिळाला की