शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या खांबावर कसे चढायचे? अळकुटीच्या विद्यार्थ्यांनी बनवले खास उपकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 19:19 IST

विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमनला आपला जीव धोक्यात घालून चढावे लागते. मात्र या वायरमन लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विजेच्या खांबावर चढण्याचे सोपे उपकरण बनवले आहे.

विनोद गोळेपारनेर : विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमनला आपला जीव धोक्यात घालून चढावे लागते. मात्र या वायरमन लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विजेच्या खांबावर चढण्याचे सोपे उपकरण बनवले आहे.पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पारनेर तालुका गणित-विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रदर्शन पाहत असताना अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववीमध्ये शिक्षण घेणारा सुहास गोरडे व दहावीतील अनिल कापसे यांनी एक अफलातून उपकरण बनवल्याचे दिसून आले. विजेची समस्या निर्माण झाल्यास विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमन लोकांना आपला जीव धोक्यात घालून जावे लागते. यासाठी चांगले उपकरण म्हणून सुहास गोरडे व अनिल कापसे यांनी खांबावर चढण्याचे उपकरण बनवले आहे. आमदार विजय औटी, सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, प्राचार्य मुकुंद जासुद यांच्यासह शिक्षणाधिकारी संभाजी झावरे, प्रवीण ठुबे यांनी उपकरण पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

असे बनवले उपकरण

सुहास व अनिल यांनी एका ठिकाणी चपलाच्या साह्याने माणूस खांबावर चढत असल्याचे पाहिले होते. त्यात लोखंडी सळ्यांचा वापर असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यांनी जाड लोखंडी सळ्या घेतल्या. सिमेंट खांबांचे आकारमानाप्रमाणे चौकोनी कड्या बनवल्या. त्यांच्या मापाप्रमाणे त्या खांबात घट्ट बसतात. त्या चौकोनी उपकरणातून विजेचा करंट बसू नये म्हणून चप्पल ठेवायची. त्यात पाय ठेवल्यास ते चौकोनी उपकरण आपल्याला खांबावर चढण्यास मदत करतेच. शिवाय खांबावर बसून आपण कामही चांगल्या पध्दतीने करू शकतो़, असे दिसून येत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर