भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यातील मंदिरे सुरु करावीत म्हणून आंदोलने करण्यात आली. आध्यात्मिक आघाडीच्या वतीने श्रीक्षेत्र कोल्हार येथील भगवती माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात आमदार विखे सहभागी झाले.
आंदोलनात माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. भास्करराव खर्डे, सभापती नंदाताई तांबे, पंचायत समिती सदस्य बबलू म्हस्के, अशोक आसावा, उपसरपंच सविता खर्डे, संचालक स्वप्नील निबे, हभप नवनाथ महाराज म्हस्के, भारत महाराज धावणे, संभाजीराव देवकर, उदय खर्डे, भाऊसाहेब घोलप, शिवाजीराव घोलप, आण्णासाहेब बेंद्रे, विजय तांबे, ऋषिकेश खर्डे, धनंजय दळे, सर्जेराव खर्डे, बब्बाभाई शेख, तबाजी लोखंडे, अमोल थेटे, दत्तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे सहभागी झाले होते. मंदिर सुरु करण्याचे मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.