शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोरगं इथ येवून बोलतच कसं ? : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:06 IST

मध्यंतरी लोणीचे सुजय विखे पाटील निमोणला येवून गेले. त्यांची भाषण झाली. आईसाहेब सुद्धा बरोबर आल्या होत्या. भाषणाचा कार्यक्रम झाला.

तळेगाव दिघे : मध्यंतरी लोणीचे सुजय विखे पाटील निमोणला येवून गेले. त्यांची भाषण झाली. आईसाहेब सुद्धा बरोबर आल्या होत्या. भाषणाचा कार्यक्रम झाला. त्यादिवसाची व आश्वीची टीका आपण गेल्या ३५ वर्षात ऐकली नाही. ते इथं आल्यावर म्हसणवाट्यात स्फुरण येणारी काही मंडळी आहे. खालच्या पातळीच भाषण ही संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही. काँग्रेस पक्षाच्या सर्वोच बॉडीचा मी सदस्य आहे. पोरगं इथ येवून बोलतच कसं ? अशी टीका करत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुजय विखे यांचा समाचार घेतला. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे विकास कामांचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते.आमदार थोरात म्हणाले, निळवंडे कामाला आपण गती दिली. माजीमंत्री मधुकर पिचड साहेब सोडता याकामी कुणीही मदत केली नाही. ५०० कोटी रुपये साईबाबा संस्थानने दिले. त्यास स्थगिती मिळाली. आपण जे करतो, प्रामाणिकपणे करतो. जे पाणी आहे, ते सगळ्यांना वाटून घ्यावे लागेल. आपल्या संस्था चांगल्या चालल्या. उसाला २५०० रुपये एफआरपी दिला. विकास पाहवत नसल्याने त्यांची भणभण वाढली. विंचू चावल्यावर विंचू चढवायचा कार्यक्रम सुरु आहे. चांगले ते मोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्वोच बॉडीचा मी सदस्य आहे. पोरंग इथ येवून कसं बोलतं ? खालच्या पातळीच भाषण ही संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही. पुढील काळात जिल्ह्यातील वडिलधा-यांना हे ऐकायची वेळ येवू नये. आपली संभ्रमावस्था दूरू करण्यासाठी आपण आलो आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात आमदारकी सोडता सर्व संस्थासाठी आपलं मतदान तिथं आहे. त्यांना वाटत आपण २८ गावात जायचं नाही. सुख-दुखात जायचं नाही, मग केव्हा जायचं ? आपण बांधलेल्या शाळा इमारतींचे उद्घाटने त्यांनी केले. आपण चुकीचे काही केले नाही. आपण कुणाच्या अन्नात माती कालवण्याचे काम केले नाही.आमदार डॉ. तांबे म्हणाले, काहीजण पक्षात राहूनही विरोध करतात. त्यांनी आपली पात्रता तपासून पाहिली पाहिजे. युवक नेत्याने सुधारणा करून घ्यावी. सत्ता बदलली की पक्ष बदलायचा, सत्तेच्याजवळ राहायचे अशी यांचे धोरण आहे. प्रास्ताविक साहेबराव आंधळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. अनिल घुगे यांनी आभार मानले.आमदार डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुगार्ताई तांबे, लक्ष्मण कुटे, शिवाजी थोरात, बी.आर. चकोर, इंद्रजित थोरात उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील