शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील हॉटेलमध्ये इराणी इसम राहिला ओळख लपून;  हॉटेल मालकासह व्यवस्थापकवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:07 IST

कोरोनाची साथ पसरण्याचे सावट असतना शहरातील तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी (दि.२४) तब्बल सहा तास एक इराणी इसम ओळख लपून राहून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला काही माहिती न देताच हा इराणी इसम हॉटेलमधून निघून गेल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर : कोरोनाची साथ पसरण्याचे सावट असतना शहरातील तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी (दि.२४) तब्बल सहा तास एक इराणी इसम ओळख लपून राहून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला काही माहिती न देताच हा इराणी इसम हॉटेलमधून निघून गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ त्या इराणी  व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले आहे. मंगळवारी पहाटे ३ वाजता हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये ईराज हुसेन रेझई (वय ४८) याने एक रुम बूक केली. यावेळी  त्याने केवळ स्वत:चे नाव सांगून इराण देशातील तेहरान येथील असल्याचे सांगितले. यावेळी हॉटेल व्यवस्थापकानेही त्याच्याकडून त्याचे ओळखपत्र घेतले नाही. तो ज्या कारमधून आला होता, त्या कारच्या  क्रमांकाची ही नोंद केली नाही. मंगळवारी सकाळी ९ वाजता ही इराणी व्यक्ती हॉटेलमधून निघून गेली. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र तोपर्यंत तो निघून गेलेला होता. सदर व्यक्तीने रूम बूक करताना हॉटेल व्यवस्थापकाला दिलेला मोबाइल क्रमांकही ही बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सदर इराणी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरिकाबाबत पोलिसांना माहिती कळविणे बंधनकारक असतानाही हॉटेल मालकाने व व्यवस्थापकाने सदर माहिती दिली नाही तसेच स्वत:ची ओळख लपून राहिल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल सिंग रेसिडेन्सीचे मालक कवलजीत सिंग गंभीर,  व्यवस्थापक रुपेश सोहनलाल गुलाटी व इराणी इसम ईराज हुसेन रेझई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा इराणी नगरमध्ये कशासाठी आला होता? कोणत्या उद्देशाने हॉटेलमध्ये राहिला.? आणि तो आता कोठे गेला आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इराण या देशातही मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरली आहे. या पार्श्वभूमीवर  नगरमध्ये वावरणारा तो इराणी  धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेल