शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

हाॅस्पिटलच बनले परीक्षा केंद्र; अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी, परीक्षा मंडळासह शिक्षण विभागाची तत्परता

By चंद्रकांत शेळके | Updated: February 23, 2024 21:06 IST

सर्वांनीच तत्परता दाखवल्याने या दोन विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टळले.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : बारावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या दोन विद्यार्थिनींच्या दुचाकीला अपघात झाला. मात्र, जखमी अवस्थेत तशाच त्या केंद्रावर पोहोचल्या. हाता-पायाला झालेल्या जखमांमुळे त्या पेपर लिहू शकत नव्हत्या. अशा स्थितीत परीक्षा केंद्र संचालक, शिक्षण विभागाने यंत्रणा हलवली. पुणे बोर्डाकडून विशेष परवानगी मिळवली व या विद्यार्थिनींना लेखनिक देत पोलिस बंदोबस्तात चक्क हाॅस्पिटलमध्ये परीक्षा केंद्र उभारून परीक्षा देण्याची संधी दिली. सर्वांनीच तत्परता दाखवल्याने या दोन विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टळले.

त्याचे झाले असे. शुक्रवारी (दि. २३) बारावीचा मराठीचा पेपर होता. कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. अशात एका विद्यार्थिनीला केंद्रावर आल्यानंतर आपले हाॅलतिकीटच घरी विसरल्याचे लक्षात आले. पेपर सुरू होण्यास थोडा अवधी असल्याने एका मैत्रिणीला घेऊन ती दुचाकीवरून हाॅलतिकीट आणण्यासाठी शहरातच असलेल्या घरी गेली. तेथून परतत असतानाच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला व त्यात दोघीही हाता-पायाला लागल्याने जखमी झाल्या. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उठवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, पेपर हुकला तर शैक्षणिक वर्ष वाया जाईल, या भीतीने त्यांनी डाॅक्टरांकडून उपचार घेण्यास नकार देत थेट परीक्षा केंद्र गाठले. मात्र, केंद्रावर आल्यावर त्यांना अधिक त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्यांना नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

दरम्यान, केंद्र संचालकांनी हा प्रकार कर्जत गटशिक्षणाधिकारी उज्ज्वला गायकवाड यांना सांगितला. गायकवाड यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ ही बाब पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मंजुषा मिसकर व सचिव औदुंबर उकिर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली. पुणे बोर्डाने तत्काळ दोन्ही विद्यार्थिनींसाठी हॉस्पिटलमध्ये परीक्षा केंद्र उभारण्याची परवानगी दिली. तसेच पोलिस बंदोबस्तही घेण्यास सांगितले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कर्जत पोलिसांना कळवले. पोलिसांनीही तातडीने दोन कर्मचारी पाठवले व या विद्यार्थिनींनी हाॅस्पिटलमध्ये पेपर दिला.वाॅर्ड झाले परीक्षा केंद्र

दोन्ही विद्यार्थिनींच्या हाताला मार लागल्याने पेपर लिहिणे शक्य नव्हते. त्यामुळे दादा पाटील महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र संचालकांनी या विद्यार्थिनींना तत्काळ लेखनिक उपलब्ध करून दिले. दोघींना हाॅस्पिटलमध्ये दोन वेगवेगळ्या खोल्यांत परीक्षेची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी दोन परीक्षकही देण्यात आले. अखेर हाॅस्पिटलच्या वाॅर्डमध्ये या विद्यार्थिनींनी साडेबारा वाजता पेपर लिहिण्यास सुरूवात केली व ठरलेल्या वेळेत पेपर सोडवला.शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली भेट

दरम्यानच्या काळात परीक्षा सुरू असताना शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. हाॅस्पिटल, पोलिस व शिक्षण विभाग या सर्वांनीच वेळेत तत्परता दाखवल्याने विद्यार्थिनींना पेपर देता आला व त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले, अशी माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षा