शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेचे कालवे पूर्ण होण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:41 IST

आता राज्यात पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या हाती महसूलसह विविध खात्यांच्या कॅबीनेट मंत्रीपदाची सत्तासूत्रे आल्याने ते निळवंडे धरणाचे प्रलंबित कालवे पूर्ण करतील, असा आशावाद लाभक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

हरिभाऊ दिघे ।  तळेगाव दिघे : तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात मंत्री असताना त्यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. आता राज्यात पुन्हा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या हाती महसूलसह विविध खात्यांच्या कॅबीनेट मंत्रीपदाची सत्तासूत्रे आल्याने ते निळवंडे धरणाचे प्रलंबित कालवे पूर्ण करतील, असा आशावाद लाभक्षेत्रातून व्यक्त होत आहे. निळवंडे धरण प्रकल्पाची वाट पाहत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघेसह जिरायत भागातील एक पिढी सरली. निळवंडे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघेसहित दुष्काळी भागात कालव्यांची कामे काही प्रमाणात झाली. मात्र काही प्रमाणात कालव्यांची कामे प्रलंबित राहिली. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस - राष्ट्रवादी तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना त्यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. तळेगाव भागातील पोखरीहवेली, कौठेकमळेश्वर, जांभूळवाडी, तळेगाव परिसरात काही प्रमाणात कालव्याची कामे झाली तर निळवंडे व पिंपळगाव कोंझिरा ( ता. संगमनेर ) परिसरात बोगद्यांची कामे झाली. मात्र त्यानंतर २०१४ साली राज्यातून आघाडी सरकार पायउतार होत युतीचे सरकार आले. या सरकारच्या काळात कालव्यांच्या कामांना अपेक्षित गती मिळू शकली नाही. त्याचे कारण म्हणजे या लाभक्षेत्रातील तीन आमदार विरोधी पक्षाचे होते. राजकीय व्यवहार लक्षात घेता निधीची कमतरता हा कालवेपूर्तीसाठी अडथळा ठरला. निळवंडे कालवेप्रश्नी भाजप - सेनेच्या सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षित गतीने कालव्यांची कामे झाली नाहीत.राज्यात सत्ता हातात नसल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ आव्हानात्मक ठरला. निळवंडे कालव्यांचा प्रश्न सोडविण्यात त्यांना मर्यादा आल्या. आता मात्र पुन्हा सत्तेत आल्याने मंत्री थोरात यांनी पहिली बैठक निळवंडे प्रकल्पासाठी घेतली. निळवंडे कालव्यांच्या कामास चालना देण्याचा आदेश त्यांनी सबंधित अधिकाºयांना दिला. त्यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांची कामे पूर्ण होवून अवर्षणप्रवण भागात निळवंडेचे पाणी येईल, असा आशावाद दुष्काळग्रस्त लाभक्षेत्रातून व्यक्त होत आहे.सिंचन निर्मितीत अपयशभंडारदरा व निळवंडे धरणांचे एकुण १९.३५९ टी.एम.सी. इतके पाणी फक्त भंडारदरा धरणांतर्गतच्या सुमारे ७५ हजार एकर लाभक्षेत्रास दिले जात आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे सरासरी फक्त १५ ते २० टक्के इतकीच पूर्ण झालेली असल्याने मंजुर लाभक्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळत नाही. निळवंडे धरण पूर्ण झाले, मात्र प्रवाही सिंचन निर्मिती करण्यात अपयश आल्याने दुष्काळी भाग पाण्यापासून वंचित राहत आहे. या भागाला मंत्री थोरात यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.

टॅग्स :DamधरणSangamnerसंगमनेर