निंबळक : नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथील भूमिपुत्राचा नागरी सन्मान ग्रामस्थांच्यावतीने नुकताच करण्यात आला. लाभेश रणसिंग याने देशात सीए परीक्षेत यश मिळवल्याबद्दल गावकऱ्यांनी त्याचा सन्मान केला.
यावेळी बदली झालेले कृषी सहाय्यक राहुल गांगुर्डे, कॉग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी निवड झालेले रमेश ठोंबरे यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राळेगण म्हसोबाचे सरपंच सुधीर भापकर होते तर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच डॉ. अनिल ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाला उपसरपंच आश्विन रणसिंग, सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर ठोंबरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश पिंपळे, दत्तात्रय दळवी, कल्याण ठोंबरे, पोपटराव पिंपळे, दत्तात्रय नवले, सिद्धेश्वर घोंगडे, संतोष पिंपळे, हरिभाऊ धाडगे, राजेंद्र ठोंबरे, संतोष शेंडगे, दत्तात्रय गलांडे, चंद्रकांत पिंपळे, रवींद्र पिंपळे, कैलास रणसिंग, विठ्ठलराव गलांडे, योगेश रणसिंग, बाळासाहेब रणसिंग, राजाभाऊ रणसिंग आदी उपस्थित होते.