शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बारा लाख बेघरांना देणार घर; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:27 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.जामखेड तालुक्यातील हळगाव येथे अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन सोमवारी (दि. १) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले़ यावेळी जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, विभागीय आयुक्त महेश झगडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के  पी. विश्वनाथा, जिल्हाधिकारी अभय महाजन आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कुकडीच्या पाण्याचे पुनर्वाटप करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल़ त्याशिवाय निळवंडे धरणाच्या कामासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातील ८०० गावांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. हळगाव येथे ६५ कोटी रुपयांचे कृषी महाविद्यालय उभे करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जामखेड येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री कर्जत येथे आले. कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा