शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

आरक्षणासाठी राज्यमार्ग रोखला

By admin | Updated: August 2, 2014 01:04 IST

नेवासा : धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने शुक्रवारी नगर-औरंगाबाद राज्यमार्गावरील नेवासा फाटा येथे शेवगाव चौकात मेंढरांसह रास्ता रोको आंदोलन

नेवासा : धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने शुक्रवारी नगर-औरंगाबाद राज्यमार्गावरील नेवासा फाटा येथे शेवगाव चौकात मेंढरांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष कान्हूअण्णा दाने, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे नेवासा तालुकाध्यक्ष अशोक कोळेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सजविलेल्या जीपवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष कोळेकर यांनी प्रास्ताविकात आरक्षणाबाबत आघाडी शासनाच्या चालू असलेल्या चालढकल वृत्तीचा निषेध केला. आरक्षणाअभावी धनगर समाज उच्च पदावर गेला नाही. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे, शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी प्रत्येक गावातील वनविभागाची जमीन चराऊ कुरण म्हणून उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. युवा नेते बाळासाहेब मुरकुटे, ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, ‘मनसे’ नेते दिलीप मोटे, सेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अनिल ताके, देविदास साळुंके, डॉ. एन.वाय.पंडित, सुनील वीरकर, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, राजेंद्र गायकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनीतभाई सुरपुरिया, प्रवीण कोकरे, नवनाथ सोलाट, सोपान भगत, कचरु भागवत, लक्ष्मण घुले, नामदेव खंडागळे, अ‍ॅड. बी.बी. काळे, अ‍ॅड. एस.डी. गांगले, अशोक कोळेकर, गावडे यांनी आपल्या भाषणातून धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा जाहीर केला. नेवाशाच्या तहसीलदार हेमा बडे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)पाच गावातील युवकांचा रास्ता रोकोतिसगाव : ‘धनगर’ शब्दाऐवजी ‘धनगड’ नामोल्लेखाच्या शासन कृतीच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील सुमारे पाच गावातील युवकांनी येथील वृध्देश्वर चौकात शुक्रवारी तासभर महामार्ग रोखला. उपसरपंच अ‍ॅड. गणेश शिंदे, राजेंद्र तागड, रामभाऊ दातीर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आदिवासीविरुध्द धनगर असा नवा संघर्ष सुरु करणारे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या भूमिकेचा निषेध करीत पिचड यांना तालुक्यात फिरकू न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादीचे संघटक दिलीप अकोलकर, पं.स. सदस्य विष्णूपंत पवार, ग्रामपंचायत सदस्य रफिक शेख, अमोल वाघ यांनी आरक्षण कृतीला पाठिंबा जाहीर केला. वरिष्ठ पातळीवर भावना कळविण्याचे आश्वासन पाथर्डीचे तहसीलदार सुभाष भाटे यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळच्या चर्चेत नामदेव सोलाट, अमोल आगाशे, अर्जुन शिंदे, भाऊसाहेब नजन, राजेंद्र तागड, संजय मतकर, बंडू जाधव यांनी भाग घेतला. आंदोलनात मांडवे, जवखेडे, मिरी, आडगाव, कोपरे आदी गावातील युवक सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनपारनेर : विविध मागण्यांसाठी पारनेर तहसील कार्यालयात शुक्रवारी महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. आमचे आंदोलन बेमुदत असल्याचे कर्मचारी संघटनेचे राजाराम गायकवाड व संतोष खेडेकर यांनी सांगितले. दरम्यान, महसूलच्या संपामुळे विविध दाखले घेण्यासाठी येणाऱ्यांची कामे खोळंबल्याने हाल झाले. नायब तहसिलदारांना तातडीने पदोन्नती मिळावी,कोतवालांना तलाठी पदाच्या परीक्षेत सहभागी करून घ्यावे, त्यांना तलाठी म्हणून बढती द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नायब तहसीलदार साधना फुलारी, मंडलाधिकारी राजाराम गायकवाड, संतोष खेडेकर व इतर कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच काम बंद आंदोलन सुरू करून राज्यातील संपाला पाठिंबा दिला. व दिवसभर धरणे आंदोलन करून सहभाग नोंदविला. तहसीलदार दत्तात्रय भावले यांना निवेदन देण्यात आले. श्रीरामपूर येथे सेतू कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी पारनेर तालुका सेतू संघटनेचे तुषार सोमवंशी,राहुल माने,श्रीकांत औटी , प्रमोद गोळे व इतरांनी निषेध करून बंद पाळला.