शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

नगर जिल्ह्यातील ७ हजार मराठा घराण्याचा इतिहास राजस्थानी भट परिवाराने केला जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 18:52 IST

नगर जिल्ह्यातील जवळपास ७ हजार मराठा समाजातील घराण्यांचा संपूर्ण इतिहास राजस्थानातील भट परिवाराने ३०० वर्षांपासून जतन केला आहे. आता ही वंशावळ एकत्रितपणे हस्तलिखित स्वरूपात लवकरच सर्वांना पाहता येणार आहे. यात आपले गोत्र, देवक, मूळ गाव, कुलदेवता याची महिती असणार आहे.

ठळक मुद्देराहुरीचे तनपुरे, अकोलेचे वाकचौरे, पाथर्डीचे लवांडे, आठरे, शेवगावचे घुले, पारनेरचे औटी, संगमनेरचे थोरात, कडलग, वाळकीचे भालसिंग, बोठे अशा जवळपास नगर जिल्ह्यातील ७ हजार मराठा समाजातील घराण्यांचा इतिहास जतन करण्यात आला आहे.राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किसनगढ येथील भट (महाराष्ट्रात त्यांना भाट म्हणतात) या परिवाराने इतिहास जतन केला आहे. सुमारे १ हजार ७३४ पासून म्हणजे पेशवेकालीन मराठा घराण्यांचा अभ्यास या परिवाराकडे पहावयास मिळतो.राज्यातील पवार, चव्हाण, परिहार, सोलंकी, शिंदे, घोरपडे, भोसले, यादव, जाधव या घराण्याचे राजस्थानातील राजपूत घराण्यांशी संबंध होते. या घराण्यांची माहिती जमा करता करता महाराष्ट्रातील सर्व मराठा व इतर जातींमधील घराण्यांची माहिती जमा करण्याचा व्यवसाय भट परिवारा

योगेश गुंडकेडगाव : आजची आधुनिक पिढी आपल्या घराण्याविषयी अनभिज्ञ आहे. फार तर आजोबा-पणजोबापर्यंत वंशावळ माहिती असते. परंतु नगर जिल्ह्यातील जवळपास ७ हजार मराठा समाजातील घराण्यांचा संपूर्ण इतिहास राजस्थानातील भट परिवाराने ३०० वर्षांपासून जतन केला आहे. आता ही वंशावळ एकत्रितपणे हस्तलिखित स्वरूपात लवकरच सर्वांना पाहता येणार आहे. यात आपले गोत्र, देवक, मूळ गाव, कुलदेवता याची महिती असणार आहे.राहुरीचे तनपुरे, अकोलेचे वाकचौरे, पाथर्डीचे लवांडे, आठरे, शेवगावचे घुले, पारनेरचे औटी, संगमनेरचे थोरात, कडलग, वाळकीचे भालसिंग, बोठे अशा जवळपास नगर जिल्ह्यातील ७ हजार मराठा समाजातील घराण्यांचा इतिहास जतन करण्यात आला आहे. राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किसनगढ येथील भट (महाराष्ट्रात त्यांना भाट म्हणतात) या परिवाराने इतिहास जतन केला आहे. सुमारे १ हजार ७३४ पासून म्हणजे पेशवेकालीन मराठा घराण्यांचा अभ्यास या परिवाराकडे पहावयास मिळतो. याच परिवारातील विजयकुमार ब्रम्हभट व गौरीशंकर ब्रम्हभट सध्या नगर येथे आले आहेत. यावेळी ‘लोकमत’ने त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.राज्यातील पवार, चव्हाण, परिहार, सोलंकी, शिंदे, घोरपडे, भोसले, यादव, जाधव या घराण्याचे राजस्थानातील राजपूत घराण्यांशी संबंध होते. या घराण्यांची माहिती जमा करता करता महाराष्ट्रातील सर्व मराठा व इतर जातींमधील घराण्यांची माहिती जमा करण्याचा व्यवसाय भट परिवाराने सुरु केला. गावोगावी फिरून या परिवारातील जुन्या लोकांनी ही वंशावळ तयार केली आहे. हा त्यांचा आता पिढीजात व्यवसाय बनला आहे. ज्या गावात बोलवणे होते त्या गावात या परिवारातील सदस्य जाऊन त्यांची सर्व वंशावळ सांगतात. तसेच घरातील नव्या सदस्यांची माहिती त्यात समाविष्ट करतात.या परिवाराने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील मराठा समाजातील घराण्यांची माहिती आपल्याकडे जतन केली आहे. याशिवाय इतर जातीमधील घराण्यांची माहितीही त्यांच्याकडे आहे.या घराण्यातील सर्व वंशज, त्यांचे गोत्र, देवक, कुलदेवता, मूळ गाव, स्थलांतरित झाले असेल तर त्याचे कारण याबाबत सर्व माहिती भट परिवाराने जतन करून ठेवली आहे. पूर्वी याकामाबाबत त्यांना धान्य स्वरूपात लोक दक्षिणा देत आता मात्र लोक देतील ते सेवाभावी वृत्तीने ते स्वीकारत आहेत. यासाठी त्यांची जबरदस्ती किंवा मानधन ठरलेले नाही. ज्या घराला त्यांची माहिती जाणून घ्यायची असते ते आदरपूर्वक त्यांचा पाहुणचार करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही माहिती ते लिखित स्वरूपात जिल्ह्यातील एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे देणार असून त्यांनी त्याचे पुस्तकरूपात प्रसारण करावयाचे आहे असे भट परिवाराचे म्हणणे आहे.

आम्ही दर पाच वर्षांनी येतो. जे बोलवतात त्यांची वंशावळ आम्ही सांगतो. नवी माहिती समाविष्ट करतो. आमच्या पूर्वजांनी मोडी लिपीत ही माहिती लिहून ठेवली आहे. आम्ही नव्या पिढीने ही लिपी शिकली आहे. नवीन माहिती आम्ही देवनागरी लिपीत लिहीत आहोत. वंशावळी संरक्षण संस्था राजस्थान ही आमची वेबसाईट आहे.-विजयकुमार ब्रम्हभट, राजस्थान

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarathaमराठा