शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

विरोधकांचे आंदोलन ही त्यांची राजकीय मजबुरी ; दानवेंनी शिर्डीत उडविली नागपूरमधील काँग्रेसच्या मोर्चाची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:08 IST

विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चाची खिल्ली उडविली.

शिर्डी : विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चाची खिल्ली उडविली.एका विवाह सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेल्या खासदार दानवे यांनी साई दरबारी हजेरी लावली. यावेळी आमदार कर्डिले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजप शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे, दिलीप संकलेचा, गजानन शर्वेकर, रवींद्र गोंदकर, बाबासाहेब डमाळे, प्रकाश चित्ते आदी यावेळी उपस्थित होते.गुजरातमध्ये चांगली परिस्थिती आहे. वातावरण कसेही दिसत असले तरी पहिल्यापेक्षा चांगली स्थिती आहे. उत्तर प्रदेशातही अशीच स्थिती दिसत होती. जवळपास दीडशे जागा निवडून येतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.राज्यात ९२ हजार बुथ असून २८८ मतदारसंघ आहेत़ प्रत्येक मतदार संघात विस्तारक नेमले आहेत. राज्यात सत्तर टक्के बुथ रचना झाली आहे. नगर जिल्ह्यातही ८५ ते ९० टक्के बुथ रचना पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. साईबाबा संस्थानच्या शताब्दीसाठी राज्य सरकार नक्कीच मदत देईल. याबाबत आपण येत्या २० तारखेला नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलू, अशी ग्वाही दानवे यांनी दिली. शिर्डीच्या कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात असतो त्यांनी आणलेल्या अडचणी आम्ही सोडवतो असे त्यांनी सांगितले.

...त्यांनाही कर्जमाफी मिळेल

भाजप सरकारने ३४ हजार २०० कोटींची कर्जमाफी केली़ जवळपास नव्वद हजार शेतक-यांना त्याचा लाभ झाला आहे़ शेतक-यांच्या खात्यात पैसे येणेही सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार विरोधकांकडे नाही तर शेतक-यांकडे लक्ष देत आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत किंवा काहींनी केलेले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी मिळेल, असा दावा दानवे यांनी केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीraosaheb danveरावसाहेब दानवे