शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ठप्प; रस्ते निर्मनुष्य, अभूतपूर्व शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:27 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रविवारी (दि.२२ मार्च) रोजी देशभरात जनता कर्फ्यू लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातून जाणाºया महामार्ग सकाळपासूनच ठप्प झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाल्याने सर्वत्र अभूतपूर्व शांतता होती.

अहमदनगर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रविवारी (दि.२२ मार्च) रोजी देशभरात जनता कर्फ्यू लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातून जाणाºया महामार्ग सकाळपासूनच ठप्प झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाल्याने सर्वत्र अभूतपूर्व शांतता होती.नगर शहरातून जाणारा नगर-पुणे महामार्गावर शनिवारी मुंबई, पुण्याकडून येणारे जथ्थे रविवारी सकाळी थांबले होते. शनिवारी दिवसभर पुण्याकडून मराठवाड्याकडे व नगरकडे येणाºयांची संख्या मोठी होती. ती आज थांबली होती. महामार्गावर अत्यावश्यक सेवेचे वाहतूक करणारे दुधाचे, रॉकेल, डिझेल, अन्नधान्यांची वाहतूक करणाºया चारचाकी वाहनांशिवाय कोणीही रस्त्यावर नव्हते. हुकून चुकून कोणी आले तरी त्यांची पोलीस चौकशी करीत होते. नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव, घोगरगाव, माहीजळगाव, रूईछत्तीसी येथे १०० बंद होता. यामुळे रस्त्यावर वाहने नसल्याने ढाबेही बंद होते. एरवी गजबजलेल्या नगर-मनमाड रस्ताही ओसाड होता. राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहाता, बाभळेश्वर येथे शुकशुकाट होता. नगर-औरंगाबाद रोडवरील घोडेगाव, नेवासा फाटा, प्रवरासंगम परिसरात सर्व हॉटेल, दुकाने बंद होती. नगर-कल्याण रोडवरील टाकळीढोकेश्वर येथे बंद होता. नगर-दौंड रस्त्यावरही शुकशुकाट होता. नगर-जामखेड, नगर-शेवगाव-पाथर्डी रोडवरही वर्दळ नव्हती. जनता कफ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे सर्व रस्ते निर्मनुष्य पहायला मिळाला. राहुरी येथे रस्त्यावर फिरणाºया पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले. कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नागरिकही त्यास हातात हात घालून कोरोनाशी लढा देत आहेत, असेच चित्र सध्या आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य