शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

ऊस दरासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 04:43 IST

राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले.

ठळक मुद्देविखेंची मध्यस्थी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लोणीतील उपोषण स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी : राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी यासाठी यशस्वी मध्यस्थी केली. अहमदनगर जिल्ह्यातील अडीच हजार रुपयांपेक्षा कमी भाव देणा-या कारखान्यांसमोर आंदोलन करण्याचे संघर्ष समितीने जाहीर केले. समितीचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध १२ शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांनी लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी दुपारी विरोधी पक्षनेते विखे यांनी सुमारे २ तास संघर्ष समितीच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करुन मागण्या समजावून घेतल्या. त्यानंतर विखे यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलवरून चर्चा करीत संघर्ष समितीच्या मागण्या मांडल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ऊस दराबाबत उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही दिली. समितीमध्ये कारखानदार, शेतकरी संघटना, साखर आयुक्त, यांच्यासह बँक व साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचाही समावेश असेल. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान १५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसमवेत समितीच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील ऊस दर व साखर धंद्यांच्या प्रश्नासंदर्भात समितीने प्रस्ताव तयार करुन १५ डिसेंबरच्या बैठकीत सादर करावा, असे फडणवीस व विखे यांच्याशी समितीने केलेल्या चर्चेत ठरले. उच्चाधिकार समितीला कायदेशीर आधार असण्यासाठी तसा अध्यादेश सरकारने तत्काळ काढावा, अशी मागणीही समितीतर्फे विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या चर्चेनंतर उपोषण मागे घेत असल्याचे समितीचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांनी जाहीर केले. विखेंसमवेत माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ.भास्करराव खर्डे, शेतकरी नेते दशरथ सावंत, बाबा आरगडे, किशोर ढमाले, भालचंद्र कांगो आदींनी भेटी देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.     

शेतक-यांच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत. शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. साखर धंद्यातील प्रश्नांकडे मागील सरकारने व याही सरकारने दुर्लक्ष केले. शेतक-यांना  त्यांच्या घामाचे दाम मिळावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. सत्तेतील लोकांनी खाजगी साखर कारखाने काढल्याने सहकारी कारखान्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. साखरेचे भाव कमी होत असल्याने साखर कारखान्यांवर भविष्यात आर्थिक संकट ओढावणार आहे.

- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलrahaataराहाताStrikeसंप