शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरबाजार समितीत बांधलेले अनधिकृत गाळे पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 17:25 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीने समिती आवारात २०१७ मध्ये ४० ते ४५ अनाधिकृत गाळ्यांचे बांधकाम केले होते.

अहमदनगर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सन २०१७ मध्ये बांधण्यात आलेले अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत. याबाबत महापालिकेने तीन महिन्यात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे बाजार समितीतील गाळेधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीने समिती आवारात २०१७ मध्ये ४० ते ४५ अनाधिकृत गाळ्यांचे बांधकाम केले होते. ते पाडण्याचे आदेश मनपा उपायुक्त यांनीकेल्यानंतर बाजार समितीने राज्य शासनाकडे अपील करन स्थगिती आदेश मिळविले होते. ते अपिल शासनाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे अपिल दाखल केले होते. त्यावर दि. ३० जुन २०२३ रोजी अंतिम सुनावणी होऊन सदर गाळे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी अहमदनगर महानगरपालिका आयुक्तांकडे सन २०१७ मध्ये तक्रार केली होती. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीने नगररचना योजना ३ अंतिम भुखंड क्रमांक २३ पैकी जागेतील आरक्षित जागेवर बाजार समितीने अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम करून बांधण्यात आलेले गाळे पाडावेत, अशी त्यांची मागणी होती. यााबबत २७ नोव्हेंबर २०१७ प्रभाग अधिकारी यांनी बाजार समितीला नोटीस काढून बांधकाम पाडण्याबाबत कळविण्यात आले होते. समितीने काहीच कार्यवाही न केल्याने तत्कालीन उपायुक्त यांच्याकडे सुनावणी होऊन २१ जुलै २०१८ रोजी मंजुर रेखांकनातील खुल्या जागेत केलेले अनाधिकृत बांधकाम १८ दिवसांच्या आत पाडण्याबाबत आदेश काढण्यात आले होते. त्या आदेशा विरोधात बाजार समितीने तत्कालीन नगर विकास राज्य मंत्री यांच्याकडे दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी अपिल दाखल केले होते.

राज्यमंत्री यांनी मनपाच्या आदेशाला स्थगिती देऊन सुनावणी ठेवली होती. त्यामध्ये सातपुते यांनी राज्यमंत्री यांच्याकडे हरकत दाखल करूनवस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर नगर विकास विभागाने बाजारसमितीचे अपिल अर्ज फेटाळून मनपा उपायुक्त यांचे आदेश कायम ठेवले होते. सदर आदेशाविरोधात बाजार समिती व गाळेधारक यांनी २०२० मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये न्यायालयाने बांधकाम पाडण्याच्या आदेशास तात्पुरते स्थगिती आदेश दिले होते. त्यामध्ये सातपुते यांच्यावतीने ॲड. एन.बी. नरवडे यांनी बाजू मांडली. २ मे २०२३ रोजी न्यायमूर्ती एस. जी. चापळगावकर व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यापुढे सुनावणी होऊन न्यायालयाने दि. ३० जुन २०२३ रोजी मनपा आयुक्त यांना ३महिन्यांच्या आत सदर अनाधिकृत गाळ्याचे बांधकाम व अतिक्रमण पाडून कार्यवाही अहवाल उच्च न्यालयात सादर करण्याचे आदेश केलेले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय