अम्मू केअर ट्रस्टचे काम राहाता तालुका उपाध्यक्ष पुंडलिक बावके हे पाहत आहेत. या माध्यमातून केलवडमधे गरीब गरजू व्यक्तींना किराणा किट, चटई, छत्री, टॉवेल वाटप करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून अस्तगाव, केलवड, खडकेवाके, साकुरी, पिंपळस, कोऱ्हाळे, रुई, आदी गावांमध्ये गरिबांना काय कमतरता आहे, असे पाहून मदतीचा हात पुढे केला जात आहे.
किराणा किट व जेवणाचे वाटप करत असताना केलवडे येथे संदीप गमे, महादू कांदळकर, अनिल गुंजाळ, योगेश गमे, रामनाथ वाघे, भागवत वाघे, भाऊनाथ गमे, अशोक खंडागळे, रामदास वाघे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
..................
कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक खेडेगावांत गरिबांना खाण्यापिण्याची मोठी अडचण येत आहे. त्यामुळे अम्मू ट्रस्टच्या वतीने प्रत्यक्ष ग्रामस्थ ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी जाऊन मदत केली जात आहे.
- पुंडलिक बावके, उपाध्यक्ष, राहाता तालुका, शिवसेना