------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाखांची मदत दिली जाणार असल्याचा एक संदेश सोशल मीडियावर फिरत होता. मात्र अशी कोणतीही योजना नसल्याने शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हा संदेश खोटा असल्याचेच अधिकारी, तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही सांगितले.
कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचे संदेश गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. ‘केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी मदतीचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्रदेखील सोबत जोडले आहे.’ हा संदेश पाहून अनेकांनी शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये चौकशी सुरू केली आहे. मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
-----------
कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचे संदेश गेल्या १५ दिवसांपसून समाजमाध्यमांवर फिरत आहेत.
---------
अर्ज करू नका, अशी कोणतीही योजना नाही
समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या संदेशाला नागरिकांनी बळी पडू नये. यासाठी नागरिकांनी आपला वेळ वाया घालवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-----------
अर्जाचे काय करणार ?
आपत्ती व्यवस्थापन विभागात अशा प्रकारचे अर्ज येऊ लागल्याने अधिकाराही गोंधळात पडले आहेत. नागरिकांना या बनावट संदेशाची माहिती व्हावी, या उद्देशाने अर्जदारांना काय उत्तर द्यायचे, असा विचार अधिकारी करीत आहेत. कोरोनाबाबत अशी कोणतीही योजना नसल्याचे जिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
--
खोटे संदेश कशाला पसरविता ?
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांनी जवळची माणसे गमावली आहेत. अनेकांच्या कुटुंबांचा आधार गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांना आता शासनाच्या आधाराचीच गरज आहे. अशा कुटुंबं शासनाकडे अपेक्षेने बघत आहेत. त्यात सोशल मिडियावरच्या खोट्या संदेशामुळे संबंधित नातावाईक निराश झाले आहेत.
---
डमी क्रमाकं -१११७