शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना आजोबाच्या कुशीत सोडून त्याने घेतला जगाचा निरोप; नातवंडांच्या चिंतेने वृद्धाची काहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:45 IST

नेहमीप्रमाणे मुलांना आजोबांच्या कुशीत सोडून तो रोजीरोटी कमवण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, अकालीच काळाने त्याच्यावर झडप घातली. घरातील हा शेवटचा मुलगा़ तोही देवाने हिरावला. त्यामुळे ७३ वर्षीय वृद्धाची नातवंडांच्या चिंतेने काहिली होतेय. 

अहमदनगर : नेहमीप्रमाणे मुलांना आजोबांच्या कुशीत सोडून तो रोजीरोटी कमवण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, अकालीच काळाने त्याच्यावर झडप घातली. घरातील हा शेवटचा मुलगा़ तोही देवाने हिरावला. त्यामुळे ७३ वर्षीय वृद्धाची नातवंडांच्या चिंतेने काहिली होतेय. आता नातवंडांना कसं सांभाळू, त्यांचं शिक्षण कसं करु, असं विचारण्यापलिकडं काहीच उरलं नसलेली ही करुण कहाणी आहे.गरडवाडीचे वामन यदू सांगळे यांची!गरडवाडी हे शेवगाव तालुक्यातील छोटसं गाव़ गावाच्या पश्चिमेला वामन सांगळे यांचे छोटेस घर आहे. सुगंधा या त्यांच्या पत्नी़ त्या ६८ वर्षांच्या आहेत. दोघेही थकलेले, शिणलेले़ त्यांना कुंडलिक, राम, लक्ष्मण आणि सुनीता अशी चार अपत्य़ कुंडलिक आणि राम हे आधीच अपघाती मरण पावलेले. तर मुलगी सुनीता यांनाही तरुणपणीच वैधव्य आले. या वृद्ध जोडप्याची म्हातारपणाची एकमेव काठी, कमावता मुलगा लक्ष्मण हा ११ दिवसांपूर्वी काम करत असताना विजेचा धक्का बसून मरण पावला. जन्मदात्या तीनही मुलांना गमावण्याचं दु:ख या म्हाता-या आई-बापांच्या वाट्याला आले आहे.सांगळे यांना दोन एकर जमीऩ तिही कोरडवाहू. मुळा कालव्यातून सुटणारे पाणीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पाहुणे, राजकीय नेते येतात़ सांत्वन करुन जातात़ रडून-रडून सांगळे कुटुंबाचे घसे कोरडे पडलेत. चेहरे काळवंडलेत. आम्ही आता या मुलांना कसं जगवू, असा एकच प्रश्न ते प्रत्येकाला विचारत आहेत.लक्ष्मण यांचा मुलगा प्रथमेश सहावीत शिकतोय तर मुलगी ज्ञानेश्वरी तिसरीत आहे. पत्नी आशा शेतकाम व मजुरी करतात. लक्ष्मण पत्नी आशा आणि मुलांना घेऊन ऊसतोडणीसाठी जायचे. पण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी महावितरणचे पोल टाकून तारा ओढण्याचे काम स्वीकारले होते. हे काम ते ठेकेदारीवर करीत होते. ६ फेबु्रवारीला लक्ष्मण सकाळी कामावर गेले. मात्र, परत घरी आलेच नाहीत. मात्र त्यांच्या मृत्युची वार्ता सांगणारा घरी आला. ते ऐकून वामन जमिनीवरच कोसळले. आता या मुलांचं शिक्षण, संगोपन कसं करायचं, हा त्यांच्या पुढला सर्वात मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर