शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Anna Hazare Hunger Strike : सरकारच्या निषेधार्थ नगरमध्ये रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:25 IST

केंद्र सरकार याची दखल न घेतल्यामुळे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरमध्ये अण्णा समर्थकांनी माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या ७ व्या दिवशी प्रकृती चिंताजनक झाली आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकार याची दखल न घेतल्यामुळे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरमध्ये अण्णा समर्थकांनी माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून आंदोलकांनी १० मिनिटात रास्ता रोको मागे घेतला. परंतू आज संध्याकाळपर्यंत अण्णांचे उपोषण न सुटल्यास खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर रात्री जागरण गोंधळ घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी यांनी नगर भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या असंवेदनशील भूमिकेचा समाचार घेतला.उद्योजक किशोर मुनोत म्हणाले, काँग्रेस सरकारनंतर मोठ्या अपेक्षेने जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. परंतु जनलोकपालसह शेतकऱ्यांसाठी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने ४ वर्षे झाली तरी पाळलेली नाही. ही जनतेची फसवणूक आहे. मोदींनी आता ‘मनकी बात’ बंद करून ‘काम की बात’ करावी, असा उपरोधक सल्लाही मुनोत यांनी दिला.आंदोलनात गिरीश कुलकर्णी, सुभाष शिंदे, निलेश मुदिगोंडा, संदीप कुसळकर, ओंकार भालेराव, तुलसीभाई पालीवाल, विशाल अहिरे, वैशाली खिलारी, वर्षा गवारे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर