शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

हरहुन्नरी बासरीवादक इसाकभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:03 IST

महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत.

करंजी : महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत. बॅण्ड हा त्यातीलच एक प्रकार आहे. करंजी येथील प्रसिद्ध भाई - भाई बॅण्डचे संस्थापक मालक इसाकभाई महेबुब पठाण यांचे नुकतेच आजारपणामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या बॅण्ड पथकामुळे करंजीचे नाव जिल्ह्यातच नव्हे राज्यात प्रसिद्ध झाले होते. बॅण्ड पथकातील मास्टर समजल्या जाणा-या इसाकभाई यांच्या निधनाने जिल्ह्यातील या लोककलेत मोठी पोकळी निर्माण झाली.इसाकभाई पठाण यांचे वडिल महेबुबभाई एक नामांकित ताशा वादक होते. दोन्ही हातावर पेटलेल्या दोन -दोन पणत्या ठेवून पणती न हलता ते ताशा वाजवत असत. हे त्यांचे अलौकिक वेगळेपण होते. त्यांनाझुंबरभाई, बशीरभाई, नजिरभाई, शब्बीरभाई व इसाक अशी पाच मुले. इसाकभाई सर्वात लहान होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, त्यानुसार महेबुबभाई यांनी रशिदभाई व इसाकभाई यांना अहमदनगर येथील मुन्शीभाई यांच्याकडे ही कला शिकण्यासाठी पाठविले. त्यात इसाकभाई उत्कृष्ट बासरीवादक झाले तर रशिदभाई अप्रतिम ट्रायपॅड वादक म्हणून आजही जिल्ह्यात परिचित आहेत. संगिताचे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी करंजी येथे भाई - भाई ब्रास बॅण्डची स्थापना केली. उपजतच सर्व बंधू कलाकार होते. त्यातच त्यांना सहकलाकार गावातीलच भेटले. त्यांनाही त्यांनी चांगली कला शिकविली. त्यामध्ये झुंबर शिंदे, बाबा रोकडे, रमेश क्षेत्रे, ज्ञानदेव क्षेत्रे, गुलाबभाई पठाण, शांतवन क्षेत्रे, फकिर महंमद अशा १४ ते १५ कलाकारांचा जबरदस्त संच तयार केला. राज्यभरातून अनेक ठिकाणासून आपल्या घरातील मंगल कायार्साठी करंजीच्या बॅण्डची लोक मागणी करू लागले. हा बॅण्ड अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्धीच्या झोतात येवून करंजीची ओळख राज्यभर झाली.त्याकाळी तमाशाला मोठया प्रमाणात प्रसिद्धी होती. तमाशाची आवड असणारा ग्रामीण भागात मोठा प्रेक्षकवर्ग होता. महाराष्ट्रातील अनेक नामवंत तमाशा फडात इसाकभाई यांना बासरी वादनाची आॅफर येवू लागली. १९९२ मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर त्यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम झाला. ते मान्यताप्राप्त आकाशवाणी कलाकार होते. आपली कला दुस-याला दिल्याने कला वाढतच जाते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इसाक भाईने जिल्हयात अनेक कलाकार घडविल. बॅण्डच्या कला क्षेत्रात आपले, गावाचे व परिसराचे नाव राज्यभर पोहचविले. एखाद्या गरीब कुटुंबाकडे लग्नासाठी द्यायला पैसे नसले तरी इसाकभाई स्वत: जाऊन लग्न वाजवत असत. ठराविक रक्कमच द्या असा कधीही आग्रह इसाकभाईंनी कोणाकडेच धरला नाही. असा हा ग्रामीण भागातील हाडाचा हरहुन्नरी कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. आजच्या धावपळीच्या युगात आणि डिजेच्या दणदणाटापुढे लोप पावत चाललेली बॅण्डची कला मात्र इसाकभाईंनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपली.- अशोक मोरे, करंजी, ता.पाथर्डी जि.अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर