शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमधील कामगारांना दिला जातोय त्रास,डिस्टन्सिंग पाळत कामगार संघटनांचा पायी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:41 IST

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनकाळात गैरफायदा घेत एमआयडीसीमधील कामगारांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघ व क्रांतीसिंह कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला.

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनकाळात गैरफायदा घेत एमआयडीसीमधील कामगारांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघ व क्रांतीसिंह कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला. मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत घोषणा देत कारखाना मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.कोरोनाच्या लॉकडाऊन काळात नोकर कपात करू नये, वेतन कपात करू नये असे आदेश असताना नगर एमआयडीसीमधील कारखानदार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. यामुळे कामगार वर्ग त्रासला आहे. या कारखानदारांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली. यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरवात पत्रकार चौक येथील शहिद भगतसिंह उद्यानातील भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण सुरवात झाली. या मोर्चात कॉम्रेड बहिरनाथ वाकळे, महेबूब सय्यद, रामदास वाघस्कर सहभागी झाले होते. पत्रकार चौक ते डीएसपी चौक, कोठला स्टँड, स्टेट बँक चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.त्यानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, कामगार प्रामाणिकरणे काम करीत आहेत. कारखान्याची उन्नती व्हावी, यासाठी घाम गाळत आहेत. तरीही काही अपप्रवृत्ती प्रयत्नांना दाद देत नाहीत. औद्योगिक कायदे, कामगार कायदे, शासननिर्णय, न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत. नफेखोरीच्या नादात कामगारांचे कायदेशीर हक्क डावलले जात आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा सर्रास भंग केला जात आहे. कामगारांना कायम न करता वर्षानुवर्षे कंत्राटी दाखवून कायद्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. मुख्य उत्पादनाचे कायम कामही कंत्राटी कामगाराकडून करून घेतले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने कामगारांना दिलासा देण्यासाठी वेतन कपात व कामगार कपात न करण्याचा आदेश दिला. या आदेशाला एमआयडीसीमधील काही कारखानदार जुमानत नाहीत. सरकारी अधिकाºयांनाही ते टोलवाटोलवी करतात. अधिकाºयांचे फोन कॉलही ते स्वीकारत नाहीत. कामगारांना बेकायदेशिरपणे कामापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कामगारांना आॅफिसमधे बोलावून बळजबरीने राजीनामे घेतले जात आहेत. जे कामगार राजीनामे देत नाहीत त्यांना बेकायदेशिरपणे निलंबित केले जात आहे. हे प्रकार तातडीने कारवाई करून थांबवावेत, अशी विनंती मोरे यांच्याकडे करण्यात आली. चौकशी करून कारवाईचे आश्वासन मोरे यांनी दिले.-------------कामगारांची शिस्त...पोलिसांचा बंदोबस्तकामगारांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटरे यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारांनी गर्दी करू नये, अशा सूचना यावेळी पोलिसांनी दिल्या. संघटनेचे मोजके पदाधिकारी व मोजके कामगार जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनीही शिस्तीचे दर्शन घडवित फिजिकल डिस्टन्सींगचे पालन केले. त्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला.---फोटो-साजिद