शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयीन आदेशापूर्वीच राहात्यामधील हनुमंतगावचा वाळूउपसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 11:47 IST

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळूउपशाला मुदतवाढ देण्याबाबतच्या नस्तीवर प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उत्तर मंत्रालयीन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, नगर जिल्हा प्रशासनाने मात्र राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देत ठेकेदाराला येथील उपशासाठी परवानगी दिली आहे.

अहमदनगर : राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळूउपशाला मुदतवाढ देण्याबाबतच्या नस्तीवर प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उत्तर मंत्रालयीन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, नगर जिल्हा प्रशासनाने मात्र राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देत ठेकेदाराला येथील उपशासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हा उपसा अधिकृत आहे का? असा संभ्रम आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.मार्च २०११ मध्ये हनुमंतगाव येथील २० हजार ब्रासच्या वाळू उपशाविषयी लिलाव झाला होता. वाळू ठेकेदाराने प्रमाणापेक्षा जास्त खोलीपर्यंत जाऊन वाळूउपसा केल्याच्या तक्रारी झाल्यानंतर तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर ठेक्याला स्थगिती देऊन तहसीलदारांनी ठेकेदारास १ कोटी ७४ लाख रुपयांचा दंड आकारला. हा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही कायम केला होता. याबाबत ठेकेदाराने महसूल राज्यमंत्र्यांकडे २०१४ मध्ये अपिल केले. अपिलात मंत्र्यांनी या उत्खननास मुदतवाढ देण्याचे अमान्य केले होते. या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा शासनास प्रस्ताव पाठविला. त्यावर आदेश करताना राज्यमंत्र्यांनी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत या ठेक्यास मुदतवाढ दिल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यमंत्र्यांच्या या आदेशाचा हवाला देत नगरचा खनिकर्म विभाग व अप्पर जिल्हाधिकाºयांनी या लिलावधारकास वाळूउपशास गत १८ मे पासून परवानगी दिली. त्यानुसार उपसाही सुरु झाला आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यमंत्र्यांनी अपिलावर आदेश केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर सचिवांकडून आदेश निघावा लागतो. तो आदेश अद्याप निघालेला नाही. मंत्रालयाकडे या आदेशाबाबतची नस्ती मागण्यात आली होती. मात्र, याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात प्रशासकीय कार्यवाही सुरु असेल तर जिल्हा प्रशासनाने लिलावास मुदतवाढ कशाच्या आधारे दिली? असा प्रश्न निर्माण होतो.‘नॉट रिचेबल’यासंदर्भात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे व जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे हेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे प्रशासनाची भूमिका समजू शकली नाही.मुख्यमंत्र्यांकडे तक्रारशासन स्तरावरुन कार्यवाही होण्यापूर्वीच हनुमंतगाव येथे अनधिकृत उपसा सुरु करण्यात आला आहे, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. हनुमंतगाव येथील ठेकेदाराने आपणाला धमकी दिली अशी अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अ‍ॅड. शाम असावा यांची तक्रार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय