शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हंगा ग्रामपंचायतीला पन्नास लाखांऐवजी मिळाले अवघे ९१ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील हंगा ग्रामपंचायत हद्दीत ३७६ करदात्यांकडून एक कोटी एक लाख ४६ हजार ३४७ रुपयांची ...

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील हंगा ग्रामपंचायत हद्दीत ३७६ करदात्यांकडून एक कोटी एक लाख ४६ हजार ३४७ रुपयांची कर आकारणी सुधारित कर आकारणीनुसार एमआयडीसीने या वर्षभरात केली. मात्र, त्यातील ५० लाख रुपये हंगा ग्रामपंचायतीला मिळणे अपेक्षित असताना अवघे ९१ हजार रुपयेच एमआयडीसीने दिल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी बबनराव आढाव यांनी दिली.

कंपन्यांच्या कर आकारणीतील ग्रामपंचायतीची ५० टक्के हिश्श्याची रक्कम जवळपास ५० लाख ५० हजार होत आहे. या रकमेची मागणी एमआयडीसीकडे केल्याचे सरपंच बाळासाहेब दळवी यांनी सांगितले.

ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांकडून करापोटी ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या रकमेतून गावच्या विकासाचे चक्र गतिमान झाले. सुधारित नियमानुसार कर वसुलीची जबाबदारी एमआयडीसीकडे गेली. वसूल करांपैकी ग्रामपंचायतीला ५० टक्के रक्कम, तर उर्वरित ५० टक्के रक्कम एमआयडीसीला मिळणार असल्याची माहिती एमआयडीसीचे अभियंता गणेश वाघ यांनी दिली.

कर कोणी वसूल करायचा या गोंधळामुळे गेल्या वर्षीही हंगा ग्रामपंचायतीला कर रूपाने अवघे तीन लाख ४० हजार रुपयेच मिळाल्याचे ग्रामविस्तार अधिकारी बबनराव आढाव यांनी सांगितले. उर्वरित रक्कम एमआयडीसीला, ना ग्रामपंचायतीकडे, त्यामुळे थकीत कर वसुलीबाबत एमआयडीसीने स्पष्ट भूमिका जाहीर केली तर संबंधित थकबाकीदार करदात्यांकडून कर वसुली करणे सोपे जाईल, असे सरपंच दळवी यांनी सांगितले.

पूर्वी हंगा ग्रामपंचायत हद्दीतील कारखानदारांकडून करापोटी ६८ लाख वसुली होती. त्यापैकी १८ ते २० लाख वसूल होत. उर्वरित रक्कम थकीत राहिल्याने थकबाकीची प्रमाण वाढले. त्याचा परिणाम थेट गावच्या विकासावर होत आहे.

ग्रामपंचायत कर आकारणीबाबत नगरचे एरिया मॅनेजर माणिकराव लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अभियंता गणेश वाघ यांच्याकडे बोट दाखविले. वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीने करआकारणी केल्यावर एमआयडीसी वसुली करणार असून, पाणीपट्टीच्या वेळी ती वसूल होईल व त्यातील ग्रामपंचायतीच्या वाट्याची रक्कम त्यांना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

---

हंगा ग्रामपंचायत क्षेत्रात एमआयडीसीत असणाऱ्या शेडवाल्यांकडून ग्रामपंचायतीला करापोटी साडेचौदा लाख रुपये येणे बाकी आहे. रिकाम्या प्लॉटवाल्यांकडूनही मोठी रक्कम थकीत आहे; परंतु ते सापडत नसल्याने थकबाकी वाढत आहे. याकामी आता एमआयडीसीनेच निर्णय घेऊन वसुलीसाठी मदत करणे गरजेचे आहे.

- बाळासाहेब दळवी,

सरपंच, हंगा

---

शासनाच्या नवीन करवसुली धोरणानुसार ग्रामपंचायत करातील ५० टक्के रक्कम एमआयडीसीला मिळणार आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा उपयोग दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी करण्यात येईल. कर वसुलीतील निम्मी रक्कम संबंधित ग्रामपंचायतीला देणार आहोत.

-गणेश वाघ,

अभियंता, एमआयडीसी, सुपा