शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

हस्त नक्षत्राचा तडाखा कायम

By admin | Updated: October 5, 2016 00:25 IST

अहमदनगर : जिल्ह्यात हस्त नक्षात्रातील पावसाचा तडाखा कायम आहे. सोमवारी तिसऱ्या माळीच्या दिवशी नगरशहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले.

अहमदनगर : जिल्ह्यात हस्त नक्षात्रातील पावसाचा तडाखा कायम आहे. सोमवारी तिसऱ्या माळीच्या दिवशी नगरशहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक तालुक्यात नदी, नाले, गाव तलाव, बंधारे तुडूंब झाले असून अनेक ठिकाणी पाणी ओव्हरफोलो झाले आहे. सोमवारी सायंकाळी मेहेकरी नदीला पूर आल्याने नगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली झाली होती. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात ४७ टक्क्यांच्या सरासरीने ६६० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३० मि.मी. पाऊस श्रीरामपुरात झाला आहे. जिल्ह्यात हस्त नक्षत्रातील पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. सलग पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने धरणे, तलाव, बंधारे तुडंूब झाले आहे. विशेष करून दक्षिण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासह राहुरी, नेवासा, शेवगाव, श्रीरामपुर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने विविध नद्यातून जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाणी झेपावत आहे. आणखीन काही दिवस असाच पाऊस झाल्यास ओला दुष्काळाची चिन्हे आहेत. रविवारी अकोले, संगमनेर वगळता सर्वच तालुक्यात दमदार पावसाच्या नोंदी आहेत. श्रीरामपुर आणि बेलापूर महसूल मंडळात १०० मि.मी. पेक्षा अधिक तर १९ महसूल मंडलात ५० मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयाच्या एकूण पावसाच्या सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा राहुरी, वांबोरी, कोल्हार, जामखेड, राहाता या भागात मुसधार पाऊस झालेला आहे. यासह शहरातही दिवसभर अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. (प्रतिनिधी)