शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आधी श्रमदान, मग शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 17:40 IST

मंडप सजला. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठ जमले. मिरवणूक निघायची वेळ झाली. अन् नवरदेव नवरीने मंडपातून येण्याऐवजी थेट माळरान गाठले. तिथं सुरू पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत दुष्काळमुक्तीसाठी आपलं योगदान दिलं. त्यांनी आधी श्रमदान केल्यानंतरच त्यांचं शुभमंगल सावधान झालं.

ठळक मुद्देपिंपळगाव वाघा रोड्या माळरानावर श्रमदाननववधू-वरांनी केले गावासाठी श्रमदान

केडगाव : मंडप सजला. मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ठ जमले. मिरवणूक निघायची वेळ झाली. अन् नवरदेव नवरीने मंडपातून येण्याऐवजी थेट माळरान गाठले. तिथं सुरू पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या श्रमदानात सहभागी होत दुष्काळमुक्तीसाठी आपलं योगदान दिलं. त्यांनी आधी श्रमदान केल्यानंतरच त्यांचं शुभमंगल सावधान झालं.वॉटर कप स्पर्धेने अनेकांना वेड लावलंय. अशाच प्रकारे तुफान आलंया...म्हणत ८ एप्रिलपासून पिंपळगाव वाघा ग्रामस्थ गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी त्याग, दातृत्व व तळमळीतून एकजुटीने झपाटून श्रमदान करीत गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी धडपडत आहेत. यातून गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय मतभेद, हेवेदावे, वैयक्तिक भांडणे, श्रेयवाद बाजूला सारून एकत्र येण्याची सुवर्णसंधी गावकऱ्यांना मिळाली. आजघडीला गाव पाणीदार करण्यासाठी शेकडो हात सरसावलेले आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी व दुष्काळमुक्तीसाठी गावातील पाणी गावातच अडले पाहिजे, यासाठी १ मे या कामगारदिनी गावात महाश्रमदान यज्ञ करण्यात आला. त्यासाठी नगर व परिसरातील गावाच्या पंचक्रोशीतील हजारांवर जलमित्र सहभागी झालेले होते. महाश्रमदानात ग्रामस्थांबरोबरच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचलित पेस बांधकाम व प्लंबिंग ट्रेनिंग सेंटर, इलेक्ट्रिशियन ट्रेनिंग सेंटर, हेल्थकेअर ट्रेनिंग सेंटर, ब्युटी ट्रेनिंग सेंटर, स्नेहालय, आमी संघटना, एल अँड टी कंपनी, पुणेकर ग्रुप, मावळा ग्रुप, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर जलमित्र यावेळी श्रमदानासाठी उपस्थित होते.रोड्या माळरानावर श्रमदानयाच दिवशी भाऊसाहेब येणारे यांचे चिरंजीव स्वप्निल यांचा विवाहसोहळा गावातीलच एकनाथ आंबेकर यांची कन्या राणी हिच्याशी पार पडला. विवाहमंडपातील सर्व विधी होण्यापूर्वी व डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी गावाशेजारील चास रस्त्यालगत असणा-या रोड्या नावाच्या माळरानावर श्रमदान सुरू असणा-या ठिकाणी जाऊन या नवदांपत्याने ग्रामस्थांबरोबर श्रमदान करीत सलग समतल चर खोदण्यासाठी योगदान दिले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarriageलग्न