शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:35 IST

पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला.

नेवासा : पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला. या दिंडीचे फटाक्यांच्या आतषबाजीने व तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.हरिनामाचा गजर करत दुपारी नेवासा येथे बस स्थानक प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यानंतर आगार व्यवस्थापक प्रियंका उन्हवणे यांनी गुरुवर्य याभास्करगिरी बाबांचे स्वागत केले.त्यावेळी उपस्थित चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा केली.यावेळी राज्यातील पहिल्या रिंगण सोहळयास "ज्ञानोबा माऊली तुकाराम"च्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात सुरुवात झाली. सर्वप्रथम वारकऱ्यांचे रिंगण सादर करण्यात आले. त्यानंतर झेंडेकरी पथकाचे रिंगण व घोड्यांचे अश्व रिंगण सादर झाले या रिंगण सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी बदामबाई विद्यालयातील विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले.तसेच सारंगधर पानकडे यांनी शिवरायांची वेशभूषा केली होती.प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, नायब तहसीलदार नारायण कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, दादासाहेब गंडाळ, सोपान गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर या बस सेवेचा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. देवगड दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी नेवासा नगरीत आली असता खोलेश्वर मंदिर चौकामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा सत्कार केला. नगरपंचायत चौकात उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्व नगरसेवकांनी दिंडीचे स्वागत केले. दुर्गादेवी मंदिरात गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी दर्शन घेतले यावेळी पुजारी सुभाष चव्हाण व दुर्गादेवी तरुण मंडळाचे अजय पठाडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मुक्कामास आली असता येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे संतपूजन केले. यावेळी महाआरती करण्यात आली.गुरुवर्य भास्करगिरी महाराज भरपूर पाऊस पडू वृक्षवल्ली फुलू दे,नद्या ओढे नाले खळखळून वाहू दे,बळीराजा सुखी होऊ दे,अशी प्रार्थना त्यांनी यावेळी विठुरायाच्या चरणी केली.शेतकऱ्यांना बळीराजा म्हटले जाते पण त्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.कर्जमाफी नको मात्र त्यांना वीज आणि पाणी मोफत दया अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हरिनामाचा गजरात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी रिमझीम पडणाऱ्या पावसाच्या सरीत शहरातून ग्रामप्रदक्षिणा केली. त्यावेळी चौकाचौकात सादर झालेले अश्वनृत्याने उपस्थितांची मने जिंकली..

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा