शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

थकबाकी भरणारांनाच शास्तीमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 10:30 IST

मार्चअखेर थकबाकीसह शास्ती भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मालमत्ताकराच्या थकबाकीसह शास्ती भरली तरच माफीचा लाभ करदात्यांना मिळणार आहे. एप्रिलमध्ये कर भरणारांना आधीच तीन महिन्यांपर्यंत सवलत असते. त्यात थकबाकीदारांसाठी ७५ टक्के शास्ती माफ केल्याने मार्चपूर्वी थकबाकीचे पैसे भरलेल्या मालमत्ताधारकांवर अन्याय केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली आहे.

ठळक मुद्देमार्चपूर्वी थकबाकी भरणारे सवलतीपासून राहणार वंचित २५ कोटी वसुली अपेक्षित

अहमदनगर : मार्चअखेर थकबाकीसह शास्ती भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मालमत्ताकराच्या थकबाकीसह शास्ती भरली तरच माफीचा लाभ करदात्यांना मिळणार आहे. एप्रिलमध्ये कर भरणारांना आधीच तीन महिन्यांपर्यंत सवलत असते. त्यात थकबाकीदारांसाठी ७५ टक्के शास्ती माफ केल्याने मार्चपूर्वी थकबाकीचे पैसे भरलेल्या मालमत्ताधारकांवर अन्याय केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली आहे.महापालिकेने १२ एप्रिलपासून दोन टप्प्यात शास्ती माफीची सवलत जाहीर केली आहे. १२ एप्रिल ते ११ मे या कालावधीत ७५ टक्के सवलत आणि १२ मे ते ११ जून या कालावधीत ५० टक्के सवलत दिली आहे. म्हणजे एका व्यक्तीकडे एक लाख रुपये थकबाकी आणि एक लाख रुपये शास्ती असेल तर त्याला पहिल्या टप्प्यातील कालावधीत दोन लाखांऐवजी सव्वा लाख रुपये महापालिकेला द्यावे लागतील आणि दुस-या टप्प्यात दीड लाख भरावे लागतील. व्याजावर व्याज जसे लागते, तसेच शास्तीवर शास्ती लागत नाही, तर दरमहा त्यामध्ये समाविष्ट केली जाते.एका वर्षाला १८ टक्के शास्तीमालमत्ताकर वसुलीसाठी एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात वसुलीचे दोन सहामाही टप्पे करण्यात आले आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत कर भरला तर त्यासाठी विशेष सवलत दिली जाते. चालू बिलाची रक्कम एप्रिलअखेर भरली तर १० टक्के आणि जूनपर्यंत भरली तर ८ टक्के सवलत दिली जाते. एक जुलैपासून दरमहा २ टक्के अतिरिक्त आकारले जातात. यालाच दंड किंवा शास्ती असे म्हटले जाते. म्हणजे मार्चनंतर भरलेल्या रक्कमेवर जुलै ते मार्च अशा नऊ महिन्यांसाठी प्रतिमाह २ टक्के मिळून वर्षाकाठी १८ टक्के दंड किंवा शास्ती आकारली जाते. दरवर्षी थकबाकी भरली नाही तर शस्तीमध्ये शास्ती अधिक केली जाते. शास्तीवर शास्ती कधीही आकारली जात नाही. ३१ मार्चपर्यंत चालू बिलाचे पैसे भरले नाही तर एक एप्रिलनंतर थकबाकीच्या रकमेवर दोन टक्के शास्ती लागू होते.तिहेरी सवलतचालू बिलाची रक्कम एप्रिलमध्ये भरली तर कराच्या रकमेत १० टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय थकबाकीदाराला शास्तीत ७५ टक्के सवलत मिळणार आहे. सदर करदात्याने मे व जून महिन्यात रक्कम भरली तर त्याला ८ टक्के चालू बिलावर सूट अधिक शास्तीत ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांसाठी ही योजना तिहेरी सवलत देणारी ठरली आहे. आधीच सवलत असल्याने दरवर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांकडून करभरणा करण्यास चांगला प्रतिसाद असतो. गतवर्षी ११ कोटी रुपये एकट्या एप्रिलमध्ये वसूल झाले होते.‘‘एप्रिलमध्ये दिलेली शास्तीमाफी ही अत्यंत चुकीची आहे. तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगून ७५ टक्के शास्तीमाफी करणार होते, तर मग अंदाजपत्रक ६१९ कोटीचे कसे होईल?मार्चअखेर शास्तीची रक्कम भरलेल्या मालमत्ताधारकांनाही ही शास्तीमाफी लागू करावी. त्यांचे पैसे नव्या बिलात वळते करून घ्यावेत. तसेच ही शास्तीमाफी दोन महिन्यांऐवजी वर्षभर लागू ठेवावी. आयुक्तांनी मार्चमध्येच शास्तीमाफी लागू केली असती तर मोठ्या प्रमाणावर वसुली झाली असती. यापूर्वी शस्ती भरणाºयांची शास्ती माफ केली नाही, तर त्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी आहे. गतवर्षी शास्तीची रक्कम ६२ कोटी असल्याचे सांगितले होते. त्यापैकी केवळ ८ कोटीच वसूल झाले. गतवर्षी संकलितकरापोटी ५५ कोटीचे उद्दिष्ट घेतले होते, मात्र केवळ १४ कोटी रुपये वसूल झाले. वृक्षकर आणि शिक्षण कराची एकूण ४ टक्के रक्कम शासनाला द्यावी लागते. त्यामुळे यंदाच्या वसुलीचा ४१ कोटीचा आकडाही निव्वळ फेक आहे. एप्रिलमध्ये मुलांची शैक्षणिक फी भरावी लागते, अशावेळी एप्रिल महिन्यात सवलत देवून त्याचा किती लाभ होईल, ते सांगणे कठीण आहे.’’-दीप चव्हाण, नगरसेवक‘‘महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शंभर टक्के वसुली अपेक्षित आहे. महापालिकेच्या कारवाईच्या भितीपोटी नागरिकांनी कर्ज काढून थकबाकी भरली. त्यानंतर शास्तीमध्ये सूट दिली. ३१ मार्चपूर्वी ज्यांनी कर भरले त्यांचीही शास्ती ७५ टक्के माफ करावी. एप्रिलमध्ये पैसे भरणा-यांना सवलत आणि मुदतीआधी पैसे भरणारांना दंड, हा प्रशासनाची भूमिका प्रामााणिक मालमत्ताधारकांवर अन्यायकारक आहे.’’-तिरुमलेश पासकंटी, नागरिक 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका