शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीने थांबली ठिबकची टिपटिप; अठरा टक्के करामुळे अनुदानाचे पैसे सरकारी तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 11:58 IST

प्रत्येक शेताला पाणी अथवा थेंबाथेंबातून अधिक उत्पादन अशा प्रकारच्या घोषणांमधून सरकार शेतक-यांना सूक्ष्म सिंचनाकडे आकर्षित करीत आहे. मात्र, त्याचवेळी १८ टक्के जी.एस.टी. लागू करीत सरकारनेच ठिबक व तुषार सिंचनाच्या खर्चात भरमसाठ वाढ केली आहे. पर्यायी जी.एस.टी.मुळे ठिबक सिंचनाची टिपटिप थांबू लागली आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : प्रत्येक शेताला पाणी अथवा थेंबाथेंबातून अधिक उत्पादन अशा प्रकारच्या घोषणांमधून सरकार शेतक-यांना सूक्ष्म सिंचनाकडे आकर्षित करीत आहे. मात्र, त्याचवेळी १८ टक्के जी.एस.टी. लागू करीत सरकारनेच ठिबक व तुषार सिंचनाच्या खर्चात भरमसाठ वाढ केली आहे. पर्यायी जी.एस.टी.मुळे ठिबक सिंचनाची टिपटिप थांबू लागली आहे.नगर जिल्ह्यातील ठिबकला मोठा फटका बसला आहे. उसाच्या शेतीसाठी ठिबक सिंचनाची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी शेतक-यांना २ टक्के व्याज दराने हेक्टरी ८५ हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. नाबार्डकडून राज्य बँकेला साडे पाच टक्के, तर राज्य बँक जिल्हा सहकारी बँकांना सहा टक्के दराने क र्ज वितरण करेल असे या योजनेचे स्वरूप आहे. शेतक-यांना ७.२५ टक्के व्याजाने क र्ज उपलब्ध होणार असून राज्य सरकार व साखर कारखाने त्यातील अधिकचा भार उचलणार आहेत. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर व्हॅटद्वारे केवळ ६ टक्के कर आकारला जात होता. रासायनिक खतांप्रमाणेच सिंचनावरदेखील ५ टक्के कर आकारला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर १८ टक्के जी.एस.टी. लावला गेला आहे.

पूर्वीपेक्षा खर्च वाढला

सरकारकडून सूक्ष्म सिंचनासाठी अल्पभूधारक शेतक-यांना ५५ टक्के तर बहु भूधारकांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. एक एकर ठिबक सिंचनासाठी पूर्वी ४० हजार रुपये खर्च येत होता. आता मात्र ५२ ते ५५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अनुदानाचे पैसे जी.एस.टी. च्या माध्यमातून पुन्हा सरकारी तिजोरीत जमा होत आहेत. त्यामुळे योजनेचा नेमका फायदा काय? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. तुषार सिंचनाच्या खर्चातदेखील अशीच वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यात चालू वर्षी १७ हजार ४२९ शेतक-यांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, जी.एस.टी. लागू झाल्यानंतर ३० ते ४० टक्के मागणी घटल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ठिबक सिंचन बसविण्यास युवा शेतकरी अधिक इच्छुक असतात. मात्र, जी.एस.टी.मुळे १२ टक्के अधिक कर लागू झाल्याने त्यांचा नाईलाज झाला आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.-संतोष डाकले, विक्रेते, बेलापूर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीGSTजीएसटी