शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रशियाला जाणा-या द्राक्षांची झाली माती : निकृष्ट तारांमुळे द्राक्ष मंडप कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:46 IST

दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

राहुरी : दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

राहुरी तालुक्यातील संक्रापूर गावातील शेतकरी राधाजी चव्हाण यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक  आणि सोसायटीचे कर्ज घेऊन चार वर्षापूर्वी द्राक्षाची लागवड केली. १० वर्षाची गॅरंटी असलेली तार द्राक्षवेली मंडपासाठी आणली, मात्र शुक्रवारी द्राक्षांसह वेल मंडप जमिनीवर कोसळला.

व्यापा-यांनी ३५ रुपये किलो दराने जागेवरून द्राक्ष खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. मंडप कोसळल्याने चव्हाण कुटुंबीयांवर आर्थिक डोंगर कोसळला.३५ रुपये किलो जागेवर भाव मिळाल्यामुळे चव्हाण कुटुंबिय आनंदी होते. द्राक्ष तोडणीनंतर सुमारे तीस लाख रुपये मिळणार होते. वारे अथवा वादळ नसतानाही बाग कोसळल्याचे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कृषी सहाय्यक शिवाजी पवार, ग्रामसेवक के. के. गायकवाड, पोलीस पाटील विजय गोसावी यांनी बागेची पाहणी केली. बागेचा पंचनामा करण्यात आला.

 

“द्राक्ष तारेची दहा वर्षाची गॅरंटी असताना अचानक मंडप कोसळला. अनुभव असल्याने उत्कृष्ट मंडप तयार झाला होता. व्यापाऱ्याची सौदा झाल्यानंतर उद्या द्राक्ष फोडणीला सुरुवात होणार होती. व्यापारी  द्राक्ष रशियाला पाठवणार होता. अचानक आलेल्या आपत्तीमुळे अडीच एकर द्राक्ष बागेचे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्या”चे चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी