शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

नवनागापूरमध्ये ग्रामसेवकाला बेदम मारहाण : एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 11:19 IST

नवनागापूर येथे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात घूसून ग्रामविकास अधिकारी संजय विश्वनाथ मिसाळ यांना एकाने जबर मारहाण केली.

अहमदनगर : नवनागापूर येथे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात घूसून ग्रामविकास अधिकारी संजय विश्वनाथ मिसाळ यांना एकाने जबर मारहाण केली. याप्रकरणी मिसाळ यांनी एमआयडीसी ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी मारहाण करणारा अरूण दादा रोकडे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.ग्रामसेवक मिसाळ हे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अरूण रोकडे हा ग्रामपंचायत कार्यालयात घूसला आणि पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी बाळासाहेब लक्ष्मण उगले व सुरेश आनंदराम तापडी यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी मिसाळ यांनी अरूण रोकडे याला तुमची लेखी स्वरूपात तक्रार द्या, अशी विनंती केली़ तेव्हा अरूण रोकडे याने मिसाळ यांची गचांडी पकडून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत दमदाटी केली. या घटनेची फिर्याद दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने अरूण रोकडे याला अटक केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस