शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

ग्रामपंचायतींना सरकारचा पुन्हा दणका; वीजबिलांच्या नावाखाली २९ कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:34 IST

चौदाव्या वित्त आयोगातून सरकारने पुन्हा ग्रामपंचायतींचा कोट्यवधी रुपयांचा निधीची परस्पर कपात केली आहे़.

अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगातून सरकारने पुन्हा ग्रामपंचायतींचा कोट्यवधी रुपयांचा निधीची परस्पर कपात केली आहे़. गेल्या वर्षी चौदाव्या वित्त आयोगातून २२ कोटी रुपयांचा निधी कपात केल्यानंतर २०१९-२० सालातील पहिल्याच हप्त्यातून २९ कोटी ४४ लाख ७० हजार ३३३ रुपयांची कपात केली आहे़. सलग दुस-या वर्षी सरकारने वीजबिलांच्या नावाखाली ग्रामपंचायतींना दणका दिला आहे़. १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात येतो़. महावितरणची वीजबिले ग्रामपंचायती भरत नाहीत, असे कारण सांगून सरकारने १४ व्या वित्त आयोगातून  वीज बिलाची रक्कम परस्पर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची सरसकट २५ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे़. ग्रामपंचायतींचे वीज बिल, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलांसाठी ही कपात करण्यात आली असल्याचे सरकारने जिल्हा परिषदेला कळविले आहे़. २०१८ मध्येही चौदाव्या वित्त आयोगाच्या पहिल्याच हप्त्यातून २२ कोटी ५० लाख रुपयांची कपात करण्यात आली होती़ मात्र, तरीही अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या घटना घडल्या होत्या़. काही ग्रामपंचायती नियमित वीज बिल भरत असूनही त्यांचेही वीज बिलाचे पैसे कपात करण्यात आले होते़. यंदा पुन्हा चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींच्या निधीतून परस्पर २९ कोटी ४४ लाख ७० हजार ३३३ रुपयांची कपात केली आहे़. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये सरकारविरोधात नाराजीचा सूर पसरला आहे़.वीज बिलांच्या वसुलीसाठी २०१८ मध्ये सरकारने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे २२ कोटी रुपये कपात केले होते़. त्यातील २ कोेटी रुपये व ८ कोटी रुपये पथदिव्यांच्या वीज बिलापोटी वर्ग केल्याचे सांगण्यात येते़. मात्र, उर्वरित ११ कोटी ५० लाख रुपयांचा हिशोब लागला नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण