शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:18 IST

हा अपघात टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत घडला. या अपघाताच्या घटनेमध्ये जामखेड तालुक्यातील हळगावमधील माजी ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ खोटे यांचा ...

हा अपघात टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत घडला. या अपघाताच्या घटनेमध्ये जामखेड तालुक्यातील हळगावमधील माजी ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ खोटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तात्याबा ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील अजिनाथ भानुदास खोटे व उत्तम तात्याबा ढवळे हे दोघे जण मोटारसायकलवर (एम.एच.-१६, ए.एन.-२३३९) हळगावहून पंढरपूरला औषधे आणण्यासाठी गेले होते. पंढरपूर येथील जोशी आयुर्वेदिक हाॅस्पिटलमधून मधुमेहाची (शुगर) औषधे घेऊन दोघे सोलापूर–पुणे हायवेवरून गावी परतत असताना, करमाळा ब्रीज खालून जाण्याऐवजी चुकून कुर्डुवाडी ब्रीज खालून कुर्डुवाडी रोड बरेच पुढे गेले. बऱ्याच वेळानंतर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. परत गाडी वळवून ते गावाकडे निघाले असता, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या उसाच्या ट्रॅक्टरने (क्रमांक एम.एच.-४५, एस-३१२९) मोटारसायकलला धडक दिली. यात अजिनाथ खोटे (वय ६९) हे जागीच ठार झाले. खोटे हे हळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. उत्तम ढवळे (वय ६५) हे जखमी झाले. त्यांच्यावर टेंभुर्णी येथील पाटील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत अजिनाथ खोटे यांचा मुलगा संभाजी खोटे याने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक नवनाथ आगतराव माळी (रा.परिते, ता.माढा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस करीत आहेत.

खोटे यांच्यापश्चात दोन मुले, मुली, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

...

१७आजिनाथ खोटे

....