शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने थकवले बोंडअळीचे अनुदान

By चंद्रकांत शेळके | Updated: October 16, 2018 15:29 IST

बोंडअळीच्या दंशाने आधीच गहाळ झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे.

चंद्रकांत शेळके अहमदनगर : बोंडअळीच्या दंशाने आधीच गहाळ झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे. जिल्ह्यासाठी तिस-या टप्प्यात येणारे तब्बल ३७ कोटी रूपयांचे बोंडअळी अनुदान गेल्या महिन्यापासून सरकारने थकवले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात तेरावा महिना पाहण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. या कपाशीचे पंचनामे करून नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडून १५७.२३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. हे अनुदान तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्त्यापोटी ८३ कोटी ७२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले. त्यातील ८३ कोटी ५१ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले. (२० लाखांचे वाटप अद्याप बाकी आहे.) परंतु तरीही अनेक गावे अनुदानापूसन वंचित राहिल्याने जिल्हा प्रशासनाने तिस-या टप्प्यासाठी ३७.६४ कोटी रूपयांची वाढीव मागणी २१ सप्टेंबर रोजी शासनाकडे कळवली आहे. मात्र मागणी करून आता महिना होत आला तरी या अनुदानाबाबत काहीच हालचाल नसल्याने शेतकरी अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत.खरीप हंगाम संपला, तरी देखील मागील वर्षीच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारे बोंडअळी अनुदान अजून मिळाले नाही. पाऊस नसल्यामुळे या हंगामातील पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीमध्ये बोंडअळी अनुदान हा शेतकºयांसाठी आधार ठरणार होता. मात्र, आता रब्बी हंगाम आला तरी देखील मागील वर्षातील अनुदान मिळाले नाही. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असताना बोंडअळीचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी दोन्ही बाजूने कात्रीत सापडला आहे. अनुदानाबाबत शासनाकडून दिशाभूल होत असल्याचे जिल्ह्यातील शेतक-यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

आतापर्यंत बोंडअळी अनुदानाची ८३.५१ कोटींची रक्कम दोन टप्प्यात शेतक-यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे. उर्वरित शेतक-यांसाठी तिस-या टप्प्यातील ३७.६४ कोटींच्या रकमेची मागणी शासनाकडे २१ सप्टेंबर रोजी केलेली आहे. मात्र ती रक्कम अद्याप आलेली नाही. - प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय