शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:49 IST

नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकार आता डाका घालायला निघाले आहे.

संगमनेर(अहमदनगर) : नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकार आता डाका घालायला निघाले आहे.दिवसेंदिवस गर्तेत चाललेल्या आयडीबीआय बँकेला वाचविण्यासाठी आयुर्विमा महामंडळाला या बॅँकेत १३ हजार कोटी रूपये गुंतवणूक करण्याचा व ५१ टक्के मालकी देण्याचा प्रस्ताव आहे. ही एक बेकायदेशीर आणि धोकादायक गोष्ट आहे, अशी टीका माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या फेसबूक पेजवरून भाजप सरकारवर केली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या २०१३ सुधारित नियमानुसार आयुर्विमा महामंडळाला कुठेही १५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. गेल्या शुक्रवारी सर्व नियम मोडून या सरकारी प्रस्तावाला मान्यता दिली. मोदी सरकारचा प्रस्ताव नाकारण्याची आजकाल कुणाची हिंमत नाही. आयुर्विमा महामंडळाकडे लोकांनी भरलेल्या प्रिमीयमपोटी दरवर्षी दोन लाख कोटी रुपये जमा होतात. त्यामुळे ही गुंतवणूक नगण्य आहे असा प्रचार सध्या सरकारचे भाट करीत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते मात्र हा आचरटपणा आयुर्विमा महामंडळाला पार बुडीत नेऊ शकतो. एखादी विमा कंपनी आर्थिकदृट्या सक्षम आहे की नाही हे तिच्याकडे असलेल्या संपत्तीवरून ठरत नाही, असे थोरात म्हणाले.सरकारचा हास्यास्पद प्रचारआयुर्विमा महामंडळाला त्यामुळे बँकिंग क्षेत्रात उतरण्याची संधी मिळेल. आयडीबीआयच्या शाखांचं देशभर जाळं आहे त्याचा वापर करता येईल, असा हास्यास्पद प्रचार सरकारतर्फे चालू आहे. ज्यात आपल्याला काडीचाही अनुभव नाही त्यात आयुर्विमा महामंडळाने का उतरावं? त्यांच्या एजंटांचं जाळं देशाच्या कानाकोपरी पसरलं आहे. शिवाय आजकाल इंटरनेटच्या प्रसारामुळे अनेक लोक विमा पॉलिसी आॅनलाईन खरेदी करतात. दुचाकीवरुन करता येईल अशा कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा काय? देश चालवायला सरकारकडे आर्थिक साक्षरता हवी. जी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे विपुल प्रमाणात होती. आता सगळा आनंदच आहे,अशी टीका माजी मंत्री थोरात यांनी भाजप सरकारवर केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर