शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

गोदामात कीडतेय मका

By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST

साहेबराव नरसाळे , अहमदनगर जिल्हाभरातील गोदामात साठवलेल्या मक्याची अद्याप विक्री करण्यात आलेली नाही़ साठवणुकीतील त्रुटीअभावी मक्याला कीड लागत आहे़

साहेबराव नरसाळे , अहमदनगरजिल्हाभरातील गोदामात साठवलेल्या मक्याची अद्याप विक्री करण्यात आलेली नाही़ साठवणुकीतील त्रुटीअभावी मक्याला कीड लागत असून, मका पिकाचे आयुष्यही केवळ सहा महिन्याचे असल्याने बहुतांश मका खराब होण्याच्या मार्गावर आहे़आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्हाभरात मका खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांकडील मका हमी भावाने खरेदी करण्यात आली़ खरेदी केलेली मका सहा महिन्यात विकणे आवश्यक आहे़ मात्र, मका खरेदी होऊन आठ महिने झाले असतानाही अद्याप मका विक्री करण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही़ नोव्हेंबर २०१३ पासून मका खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती़ त्यासाठी जिल्हाभरात १४ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते़ या खरेदी केंद्रात खरेदी केलेली मका तालुकास्तरावरच्या शासकीय गोदामात साठविण्यात आली़ सर्वाधिक म्हणजेच २७ हजार ६१४ क्विंटल मका वांबोरी (ता़ राहुरी) केंद्रावर खरेदी करण्यात आली़ तर पाथर्डी केंद्रावर छटाक मकाही खरेदी करण्यात आली़ तर नगर केंद्रावर ३८८० क्विंटल मका खरेदी करण्यात आली़ अकोले तालुक्यात जानेवारी २०१४ मध्ये मका खरेदी केंद्र काही दिवसांसाठीच सुरु करण्यात आले होते़ या केंद्रावर १२४६ क्विंटल मका खरेदी करण्यात आली़ कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, राहाता, जामखेड या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मका खरेदी करण्यात आली़ जिल्हाभरात १ लाख ५० हजार ८६६ क्विंटल मका खरेदी करण्यात आली़ ही मका तालुकास्तरावरील गोदामात साठविण्यात आली आहे़गलथानपणामुळे मका विक्री नाहीमका पिकाचे सरासरी आयुष्य केवळ सहा महिन्याचे आहे़ त्यामुळे सहा महिन्याच्या आत मका विक्री करणे आवश्यक आहे़ मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गलथानपणामुळे अद्याप मका विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही़ धुरीकरण आणि औषधीकरण केल्यास मका सुमारे आठ ते दहा महिन्यापर्यंत टिकते़ मात्र, जिल्ह्यातील अनेक गोदामांमध्ये धुरीकरणच झाले नसल्याचे सांगण्यात येते़भारतीय खाद्य निगमच्या व्यवस्थापकांनी १७ मे रोजी तपासणी केली असता मक्याला कीड लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे़ त्यावर धुरीकरण व औषधीकरण करण्याची मागणी करुनही व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही़ साठविलेल्या मक्याची तातडीने विल्हेवाट लावावी़-अनिल घनवट, शेतकरी संघटना.भारतीय खाद्य नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी नेले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतर विक्री प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल़- सोपान कासार,जिल्हा पुरवठा अधिकारी