शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीतील बंधारे दुरूस्त करणार-लहू कानडे; नाऊर येथे प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:19 IST

गोदावरी नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. नाऊर ते निमगावखैरी रस्त्याचे उर्वरित कामही तडीस नेणार आहे, अशी ग्वाही काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांनी दिली. नाऊर येथील प्रचारसभेत कानडे बोलत होते.

श्रीरामपूर : गोदावरी नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. नाऊर ते निमगावखैरी रस्त्याचे उर्वरित कामही तडीस नेणार आहे, अशी ग्वाही काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांनी दिली. नाऊर येथील प्रचारसभेत कानडे बोलत होते.कानडे म्हणाले, गोदावरी नदीवरील नाऊर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाला  गोविंदराव आदिक पाटबंधारे मंत्री असताना मंजुरी मिळाली. बंधाºयाचे काम काँग्रेस पक्षाच्या सरकारने पूर्ण केले. लोखंडी अर्ध गोलाकार पिना बदलून जादा वजनाच्या सरळ पिना टाकून जयंत ससाणे यांनी बंधारा अडवला. तो पूर्ण क्षमतेने भरल्याने नाऊर, जाफराबाद, नायगाव, मातुलठाण या गावात बागायत क्षेत्र वाढले. गोदावरी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बंधाºयाचे नुकसान झाले. लोकप्रतिनिधींनी सर्वात प्रथम बंधारे दुरुस्तीसाठी निधी आणायला हवा होता. परिसरातील शेतकरी स्वत: वर्गणी गोळा करुन बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. हे काम सरकारकडून करून घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी स्वत: खर्च करतो, याची खंत लोकप्रतिनिधींना वाटत नाही का? करण ससाणे म्हणाले, नाऊर, रामपूर, गोवर्धन, सराला, नायगाव येथील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधी यांनी काय काम केले, असा प्रश्न निर्माण होतो. कानडे यांना संधी द्या. त्यांच्याकडून रस्त्यांची कामे पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे.  सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, कैलास बोर्डे, जितेंद्र भोसले, कवाडे गटाचे संतोष मोकळ आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, गोपूतात्या शिंदे, युवा नेते हेमंत ओगले, डॉ. बापूसाहेब आदिक, सुभाष राजुळे  उपस्थित होते.माजी नगरसेवक नजीर मुलानी यांनी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. मुलानी यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची भेट घेतली. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, हेमंत ओगले, भाऊसाहेब डोळस, नगरसेवक मुक्तार शाह, मुजफ्फर शेख उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019