श्रीगोंदा : येथील डॉ. विजय बगाडे हे पुण्याला गेले असता त्यांच्या श्रीगोंदा येथील कासार गल्लीतील बंद बंगल्याचे दार उघडून चोरट्यांनी एक लाख किमंतीच्या देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरल्या. पण आणखी चोरीच्या नादात चोरलेल्या मूर्र्तींची पिशवी ते घरातच विसरून गेले.गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. डॉ. बगाडे यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संजय सातव व निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.गुरुवारी रात्री चोरांनी बगाडे यांच्या बंगल्यात देवघरातील देव चोरून एका पिशवीत भरले. पिशवी सोफासेटवर ठेऊन त्यांनी बेडरूमकडे मोर्चा वळविला. वरच्या मजल्यावरील सागर वैष्णव यांनी चोर चोर म्हणून आरोळी ठोकल्यानंतर चोरटे पळून गेले. जाताना चोरलेल्या मूर्र्तींची पिशवी गडबडीत सोफासेटवर विसरून गेले. त्यामुळे देवांच्या या मूर्ती बचावल्या.
देव चोरीस जाता जाता वाचले : श्रीगोंद्यातील बंगला फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:24 IST