निंबळक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या देहरे (ता. नगर ) येथील नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे सदस्य दीपक दरे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रथम मोहित शरद करंडे (९५.८० टक्के), द्वितीय आरती शिवाजी बनकर (९३.६० टक्के), तृतीय दिव्या भानुदास भगत (९२.८o टक्के) यांनी उल्लेखनीय यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सदस्य दीपक दरे, प्राचार्य लियाकत देशमुख पर्यवेक्षक शिरीष टेकाडे यांनी कौतुक केले. यावेळी ए. आर. बर्डे, ए. डी. कांडेकर, एस. एन. राशीनकर, ए. यू. लष्कर, ए. ए. लंगोटे, ए. ए. लोखंडे, पी. पी. मुळे, एस. एन. राशीनकर, ए. डी. कांडेकर, एस. एम. आघाव, ए. एस. निमसे, एस. एस. कटारे, व्ही. बी. सोनवणे, आर. एस. पवार, एस. डी. येणारे, दादाराम हजारे, सचिन गोरे यासह शिक्षकेतर कर्मचारी गोत्राळ, गाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. यू. लष्कर यांनी केले. शिरीष टेकाडे यांनी आभार मानले.