श्रीरामपूर : मुळा प्रवरा वीज संस्थेचे उपाध्यक्ष जी.के. पाटील यांनी राजकीय व सामाजिक जीवनात कोणताही गटतट, जातपात व लहान-थोर असा भेदभाव केला नाही. ते सर्वांमध्ये मिसळून जाणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते, अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केली. पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शिरसगाव येथे विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विठ्ठल मंदिरात श्रद्धांजली अर्पण केली. माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सभापती सचिन गुजर, नानासाहेब शिंदे, डॉ. वंदना मुरकुटे, बाबासाहेब दिघे, सचिन बडधे, साईनाथ गवारे, अरविंद थोरात, अण्णासाहेब गवारे, भागचंद औताडे, गणेश मुदगुले, आबासाहेब गवारे, दिनकर यादव, इसाक पठाण, राजेंद्र गवारे, डॉ. बाबूराव उपाध्ये आदी उपस्थित होते.
जी.के.पाटील यांना
By | Updated: December 7, 2020 04:14 IST