शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये काळ्याबाजारात नेताना रेशनचा ५ लाखांचा गहू पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:55 IST

काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा ५ लाख रूपयांचा गहू कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील कायनेटिक चौकात जप्त केला.

अहमदनगर : काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा ५ लाख रूपयांचा गहू कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील कायनेटिक चौकात जप्त केला. पोलिसांनी गहू घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाला पकडले तेव्हा त्याच्याकडे नगर बाजार समितीचे बनावट लेटर सापडले. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक घनश्याम गवळी यांनी फिर्याद दाखल केली आहे.रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती कोतवाली ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना समजली होती. माहितीनुसार शहरातील कायनेटिक चौकात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, कॉन्स्टेबल दीपक गाडीलकर, सुमीत गवळी, प्रभाकर भांबरकर, बंडू भागवत, रवींद्र टकले यांनी सापळा लावून गव्हाच्या ट्रकसह चालक भाऊसाहेब गोरख पोकळे (वय ३० रा. अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड) याला ताब्यात घेतल. यावेळी ट्रकमध्ये पांढ-या रंगाच्या गोण्यामध्ये भरलेला ९ हजार ५०० किलो गहू आढळून आला. पथकाने पोकळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नगर बाजार समितीतून हा गहू खरेदी केला असल्याचे सांगत पथकाला बिल व समितीचे लेटर दाखविले. हे लेटर बनावट असल्याचा संशय आल्याने पथकाने बाजार समितीकडे याची चौकशी केली असता ते लेटर त्यावरील शिक्के व बिल बनावट असल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी पुरवठा विभागाला माहिती दिल्यानंतर माळीवाडा विभागाचे पुरवठा निरीक्षक गवळी यांनी पोकळे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

रेशनचा गहू साध्या गोण्यात

रेशनचा गहू साध्या पांढ-या रंगाच्या गोण्यात भरून तो सुपा येथील विक्रीसाठी नेण्यात येत होता. हा गहू पाटोदा व अंमळनेर परिसरातून आणल्याचे समजते. याबाबत कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत. रेशनचा गहू विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असून, यामध्ये बरेच जण सहभागी आहेत. सुपा येथील एका मिलमध्ये हा माल विकला जातो. सुपा येथे गहू खरेदी करणारे कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस