शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फेकून दिलेल्या अर्भकाला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 17:28 IST

कुकाणा येथे नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या फेकून दिलेल्या अर्भकाला स्वयंसेविका ज्योती चित्ते यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.

कुकाणा : कुकाणा येथे नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या फेकून दिलेल्या अर्भकाला स्वयंसेविका ज्योती चित्ते यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. सामाजिक कार्यकर्ते संदिप वाघ आणि कुकाणा आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका ज्योती रमेश चित्ते यांच्या सतर्कतेमुळे फेकून दिलेल्या जिवंत नवजात अर्भकाला जीवदान मिळाले.देवगाव रस्त्या लगतच्या नवीन वसाहतीच्या मागील बाजूस व मोठीवस्ती असलेल्या ठिकाणी शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान नाभिक समाजाचे कार्यकर्ते संदिप वाघ हे आपल्या बंगल्याच्या दुस-या मजल्यावर व्यायाम करत असताना बंगल्याच्या मागील बाजूने लहान बाळ रडण्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह खाली आले असता त्यांना तेथे एक स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसले. त्यांनी शेजारी राहत असलेल्या कुकाणा आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका ज्योती रमेश चित्ते व पती रमेश चित्ते यांना याबाबत माहिती दिली. डॉ. समीर बाफना यांच्याशी संपर्क केला. तोपर्यंत चित्ते दाम्पत्याने त्या मुलीला घरात आणून स्वच्छ केले. त्यावेळी डॉ. बाफना यांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाची तपासणी करून सुस्थितीत असल्याचे सांगितले. चित्ते व वाघ यांच्या मदतीने मुलीला हॉस्पीटल मध्ये घेवून आले. यावेळी डॉ. बाफना यांनी कुकाणा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री सारुक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्वरीत डॉ. अरूण वाबळे, सुरेश थोरात, भिमा लवांडे यांच्या सहभेट देवून ते नवजात अर्भक ताब्यात घेतले. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अहमदनगर येथील स्नेहालयाशी संपर्क साधला. कुकाणा पोलीस स्टेशन पोलीस नाईक संदिप गायकवाड, पो.कॉ. अशोक कुदळे यांनी घटनास्थळास भेट दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा