शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांचे प्रतिनिधी जाताच जिल्हा रुग्णालयाने केले अपंगांना प्रमाणपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 10:07 IST

जिल्हा रूग्णालयात दिवसभर ताटकळत बसूनही अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप न करता पुढच्या बुधवारी या असा निरोप दिला. याबाबत उपस्थित अपंग बांधवांनी संताप व्यक्त करत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयातील हेळसांड डॉक्टरांविरोधात संताप

अहमदनगर : जिल्हा रूग्णालयात दिवसभर ताटकळत बसूनही अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप न करता पुढच्या बुधवारी या असा निरोप दिला. याबाबत उपस्थित अपंग बांधवांनी संताप व्यक्त करत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली.  रूग्णालयात माध्यमांचे प्रतिनिधी जाताच यंत्रणा तत्काळ कामाला लागली आणि अवघ्या दोन तासांत सर्व अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्यांची जिल्हा रूग्णालयात वारंवार हेळसांड होत असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा निदर्शनास आले. जिल्हा रूग्णालयात दर बुधवारी अपंगांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्राचे वाटप केले जाते.  बुधवारी जिल्हाभरातून अंध, अस्थीव्यंग, मूकबधिर असे विविध शारीरिक अपंगत्व असलेले ५०० जण रूग्णालयात आले होते. तीन आठवड्यापासून जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी संपावर असल्याने अपंगांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे बुधवारी गर्दी झाली होती. तपासणीसाठी दिवसभर रूग्णालयात थांबून राहिलेल्या अपंग बांधवांना डॉक्टराचे नातेवाईकांचे निधन झाले असल्याने ते आले नाहीत असा निरोप देण्यात आला. यावेळी अपंग बांधवांनी रूग्णालय प्रशासनाचा निषेध करत संताप व्यक्त केला. या ठिकाणी अनेक रूग्ण अकोले, संगमनेर, कर्जत, जामखेड आदी दूरवरील तालुक्यातून आले होते़ रूग्णालयात माध्यमांचे प्रतिनिधी जाताच प्रमाणपत्रांचे वाटप केले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय