----------------
मीरावली पहाड येथील संदल उरूस स्थगित
अहमदनगर : तालुक्यातील कापूरवाडी येथे सोमवारी (दि. १३) व मंगळवारी (दि.१६) ह. सय्यद जैनुल आबेदीन जलालबाबा उर्फ छोटेबाबा दर्गाचा संदल व उरूसचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशाप्रमाणे व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याने कळविल्याप्रमाणे संदल उरूस व भंडारा कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. तरी भाविकांनी संदल उरूस रद्द झाल्यामुळे मीरावली पहाडावर सदर दिवशी येऊ नये, असे आवाहन दर्गा ट्रस्टचे वंशावळ विश्वस्त आसिफ पीरखान पठाण, अध्यक्ष हाजी अन्वर खान, सदय्य हमीद रुस्तुम, खादीम मुजावर हाजी गोटू जहागिरदार, शेख अब्दुल रऊफ (बाबा) जहागिरदार, हाजी फक्ररोद्दीन जहागिरदार, शेख इरफान आणि शेख इम्रान जहागिरदार, शेख साहेबान जहागिरदार, शेख फैजान बाबा जहागिरदार आदिंनी केले आहे.
-------------------
माध्यमिक विद्यालयात फुलेंना अभिवादन
अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना बुधवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य चंद्रकांत चौगुले उपस्थित होते. या कार्यक्रमास मेघा कुलकर्णी, सय्यद शाहिदा, शेख समीना, प्रा. मंगल अहिरे, पठाण आसमा नाजीया शेख व आदी उपस्थित होते. मेघा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शेख समीना यांनी आभार मानले.
-----------------